
#Coronavirus वाढती गर्दी टाळण्यासाठी रेल्वे तिकिटांच्या किंमतीत वाढ, प्लॅटफॉर्म तिकीटही 10 रुपयांवरून तब्बल 50 रुपयांवर!
कोरोनाच्या जाळ्यात जग अडकलेलं असताना मुंबईतील वाढती गर्दी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीय, त्यामुळे आता प्रवाशांना रोखण्यासाठी तिकिटांच्या किंमतीच रेल्वेने वाढवल्या आहेत.

मुंबई : रेल्वे स्थानकांवर गर्दी होऊ नये म्हणून सरकारने हे पाऊल उचललं आहे, त्यामुळे रेल्वेने प्रवास करायचा असेल किंवा प्लॅटफॉर्म तिकीट जरी काढायचं झालं तर प्रवाशांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत, सरकारही सर्वतोपरी प्रयत्न करत आहे मात्र शासनासमोरील मोठं आव्हान म्हणजे गर्दी, मुंबईची गर्दी!
coronavirus | मुंबईतील लोकल, मेट्रो, बस सेवा आठवडाभर बंद होणार?
मुंबईत मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या तीनही मार्गांवर प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. रविवार असला तरीसुद्धा प्रवाशांची संख्या काही कमी व्हायचं नाव घेत नाही, ऑफिस, शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या जरी दिल्या असतील तरी पूर्णपणे कार्यालयं बंद झालेली नाहीत. अजूनही कार्यालयं भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी पूर्वीप्रमाणेच गर्दी दिसते. कोरोनामुळे हे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा होती मात्र तसं चित्र दिसत नाही. मुंबईच्या लोकसंख्येमुळे गर्दी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपायांवर पाणी फेरलंय.
प्लॅटफॉर्मवरील वाढती गर्दी रोखण्यासाठी आता पश्चिम रेल्वेने हे पाऊल उचललं आहे. पश्चिम रेल्वेने काही स्थानकांवर प्लॅटफॉर्मवरील तिकीट 10 रुपयांवरून थेट 50 रुपये करण्यात आलं आहे. हा नियम केवळ त्याच स्थानकांवर लागू होईल ज्या स्थानकांवर गर्दीचं प्रमाण जास्त आहे. पुढील काही दिवसांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी म्हटलं आहे की प्रत्येक विभागातील 10 ते 15 रेल्वे स्थानकांवर गर्दीचं प्रमाण जास्त आहे आणि केवळ त्याच स्थानकांवर हा नियम लागू करण्यात आला आहे. सोबतच रेल्वे स्थानकांवर अस्वच्छता पसरवणाऱ्यांच्या दंडातही वाढ करण्यात आली आहे. लोकांनी गरज असल्यावरच प्रवास करावं असाही सल्ला शासनाकडून दिला जात आहे.
Corona Effect | मुंबईतील लोकल, मेट्रो, बस सेवा बंद करण्याची शक्यता
वातानुकूलित रेल्वेंमधील चादरींचा पुनर्वापर आणि रेल्वेतील पडद्यांमार्फत कोरोनाच्या इन्फेक्शनची लागण होते या अफवांवर रेल्वेने स्पष्टीकरण दिलं आहे. रेल्वेतील चादरी आणि पडदे हटवण्यात आले आहेत जेणेकरून त्यामार्फत संसर्ग होणार नाही. पश्चिम रेल्वेमध्ये एकूण 758 स्थानकं आहेत ज्यांपैकी 400 मोठी स्थानकं असून त्यातील 250 स्थानकांवर हा नियम लागू करण्यात आला आहे, रेल्वेच्या तिकिटात आणि प्लॅटफॉर्म तिकिटात वाढ केली गेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
