एक्स्प्लोर
डहाणू-पनवेल ट्रेन न थांबल्यानं उमरोळी स्थानकात प्रवाशांचा रेल रोको
डहाणू-पनवेल मेमू ट्रेन उमरोळी स्थानकात न थांबवल्याने संतप्त प्रवाशांनी ट्रॅकमध्ये उतरुन थेट रेल रोको केला. डहाणू-पनवेल मेमू ट्रेन न थांबल्यानं त्यामागून येणारी अंधेरी लोकल प्रवाशांनी अडवली.
पालघर : डहाणू-पनवेल मेमू ट्रेन उमरोळी स्थानकात न थांबवल्याने संतप्त प्रवाशांनी ट्रॅकमध्ये उतरुन थेट रेल रोको केला. डहाणू-पनवेल मेमू ट्रेन न थांबल्यानं त्यामागून येणारी अंधेरी लोकल प्रवाशांनी अडवली. ट्रेन न थांबल्यानं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचा खोळंबा झाला. केळवे रोड इथं ही घटना घडली.
प्रवाशांनी बराच वेळ अंधेरी लोकल अडवून धरली होती. अखेर बराच वेळानंतर संतप्त प्रवाशांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. यामुळे सध्या पश्चिम मार्गावरच्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. दरम्यान, हा नेमका प्रकार कशामुळे घडला याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही.
मात्र, या सर्व प्रकारानं प्रवाशांना बराच त्रास सहन करावा लागत आहेत. त्यामुळेच मोटरमन आणि स्टेशन मास्टरवर कारवाई करणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
नाशिक
बातम्या
क्राईम
Advertisement