Badlapur School News : बदलापूर प्रकरणात आंदोलक संतापले! शाळेच्या तोडफोडीनंतर रेल्वे ट्रॅकवर केली दगडफेक, लोक रूळावर बसल्याने रेल्वे सेवा ठप्प
Badlapur School News : संतप्त पालक आणि बदलापूरकरांनी आज (मंगळवारी) शाळेसमोर आंदोलन केली, शाळेची तोडफोड केली. या आंदोलनाचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत.
Badlapur News : बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संतप्त पालक आणि बदलापूरकरांनी आज (मंगळवारी) शाळेसमोर आंदोलन केली, शाळेची तोडफोड केली. या आंदोलनाचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. यातील काही आंदोलकांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकात आणि रेल्वे रूळावर आंदोलन सुरू केलं. त्यामुळे मुंबईहून येणारी आणि मुंबईकडे जाणारी अशा दोन्ही रेल्वे सेवेला त्याचा फटका बसला आहे. बदलापूरकरांच्या या आंदोलनामुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. (Badlapur News)
दोन चिमुकल्या मुलींवर शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर आज सकाळी साडेसहा वाजता सर्व पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करून संताप व्यक्त केला. मोठ्या प्रमाणावर शाळेची तोडफोड देखील केली. संतप्त पालकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको केले. डाऊन मार्गावरील कोयना एक्सप्रेस या सर्व संतप्त आंदोलकांनी रोखून धरली.साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी अशी दोन्ही रेल्वे सेवा बंद पाडली. आंदोलक रेल्वे रुळावर बसल्याने रेल्वे स्टेशन परिसरात गोंधळ उडाला त्यामुळे लोकल वाहतूक ठप्प झाली. अकरा वाजेपर्यंत पोलीस आणि रेल्वे सुरक्षा यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आरोपीच्या फाशीची मागणी करत घोषणाबाजी केली.
रेल्वे रूळावर आणि रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे अप मार्गावरील रेल्वे वाहतूक वांगणी स्थानकापर्यंत थांबवण्यात आली आहे. तर डाऊन दिशेकडील रेल्वे सेवा अंबरनाथ स्थानकात थांबवण्यात आली आहे. संतप्त पालकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको केले. डाऊन मार्गावरील कोयना एक्सप्रेस या सर्व संतप्त आंदोलकांनी रोखून धरली. बदलापूर येथील रेल रोकोमुळे आता पर्यंत 10 एक्सप्रेस दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत, कर्जत, पनवेल, ठाणे या मार्गाने एक्सप्रेस चालवल्या जात आहेत.
नेमकं काय घडलं?
बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडल्याची माहिती आहे. या प्रकरणानतंर पीडित मुलीच्या कुटुंबाने 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही.
यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास करुन आरोपीला अटक केली.
VIDEO - Badlapur School : बदलापूर प्रकरणात आंदोलक संतापले, शाळेची तोडफोड, रेल्वे ट्रॅकवर दगडफेक