एक्स्प्लोर
राहुल महाजन तिसऱ्यांदा विवाहबंधनात, 18 वर्षांनी लहान कझाकिस्तानी मॉडेलशी लग्न
कझाकिस्तानची मॉडेल नताल्या इलिनाशी राहुलने विवाह केला आहे. मुंबईतील मलबार हिल येथील एका मंदिरात हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी केवळ दोघांचे कुटुंबीय उपस्थित होते.

मुंबई : भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा पुत्र आणि रिअॅलिटी शोमधून स्वत:ची वादग्रस्त ओळख निर्माण करणारा राहुल महाजन तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. 18 वर्षांनी लहान असलेली कझाकिस्तानची मॉडेल नताल्या इलिनाशी राहुलने विवाह केला आहे. मुंबईतील मलबार हिल येथील एका मंदिरात हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी केवळ दोघांचे कुटुंबीय उपस्थित होते.
राहुलचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. राहुलची आजवर दोन लग्नं झाली असून दोन्ही पत्नींसोबत त्याचा घटस्फोट झाला आहे. त्याची पहिली पत्नी श्वेता ही पायलट होती तर दुसरी पत्नी डिम्पी ही मॉडेल होती. आता हे राहुलचे तिसरे लग्न आहे. दोघांनाही ओळखणाऱ्या एका मित्रामुळं राहुल आणि नताल्या यांची ओळख झाली होती. दीड वर्षांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. गेल्याच महिन्यात राहुलने नताल्याला लग्नाची मागणी घातली.
डिम्पी आणि श्वेता माणूस म्हणून चांगल्या
माझे पहिले दोन्ही विवाह खूप घाईत झाले होते. आधीच्या दोन्ही जोडीदार डिम्पी आणि श्वेता माणूस म्हणून चांगल्या होत्या. मात्र आम्ही एकमेकांसाठी योग्य नव्हतो असे मला नेहमी वाटते. त्यामुळे कोणत्याही नात्यात अडकायचे नाही असेच मी ठरवले होते. पण नताल्या ही माझी जोडीदार म्हणून अगदी योग्य असल्याचे मला जाणवले, असे राहुलने म्हटले आहे.
नताल्या हिंदू नसली तरी रितीरिवाज आवडतात
आम्ही लग्न एकदम साध्या पद्धतीने करायचे असे सुरुवातीलाच ठरवले होते. एवढेच नव्हे तर माझ्या या आधीच्या नात्यांमुळे लोकांना चर्चेचा एक विषय मिळू शकतो आणि त्यामुळे लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी लग्नाबाबत सगळ्यांना सांगायचे असे मी ठरवले होते. पण ते शक्य झाले नाही. नताल्या ही हिंदू नसली तरी तिला आपले रितीरिवाज खूप आवडतात. तिने मंगळसूत्र देखील घालण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या आयुष्याची नताल्यासोबत मी एक नवी सुरुवात करत आहे, अशी प्रतिक्रिया राहुलने दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
