एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

काँग्रेसचं मिशन मुंबई; राहुल गांधी 28 डिसेंबरला मुंबई दौऱ्यावर, शिवतीर्थावर सभा घेणार

मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं मिशन मुंबई. राहुल गांधी 28 डिसेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार असून ते शिवतीर्थावर सभाही घेणार आहेत.

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं मिशन मुंबई सुरु होताना दिसत आहे. डिंसेबर महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. यावेळी पहिल्यांदाच राहुल गांधी शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत. आतापर्यंत कायमच शिवसेना आणि मनसेनं इथे सभा घेतल्या आहेत. पण आता पक्षाचं पुर्नरुजीवन करण्यासाठी आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी काँग्रेसही शिवतीर्थावर सभा घेणार आहे. त्यामुळे आता यावर शिवसेना आणि मनसे यांची काय भूमिका असणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, राहुल गांधी लवकरच मुंबईत भेटीसाठी येतील. तसेच ते मुंबईतील राजकीय परिस्थितीसोबतच त्यांच्या पक्षाचाही आढावा घेतील, असं सूचक वक्तव्यही संजय राऊत यांनी केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर 28 डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. याच दिवसाचं औचित्य साधत राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. केवळ राहुल गांधीच नाही, तर सोनिया गांधीही मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता असल्याची माहिती महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितलं आहे. 

राहुल गांधी 28 डिसेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. अद्याप त्यांचा हा दौरा कसा असेल आणि किती दिवसांचा असेल, याबाबात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मुंबई दौऱ्यावर राहुल गांधी शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची असणार आहे. अशातच काल काँग्रेसच्या गोटात एक महत्त्वाची बैठक पार पडली. याबाबत बोलताना महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितलं की, या बैठकीत आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबतच्या रणनितीबाबत चर्चा केली आहे. मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडी कुणासोबत करायची? याबाबत अद्याप निश्चितता झालेली नाही. यासंदर्भात आणखी काही बैठका होती आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणाले. 

दरम्यान, आतापर्यंत शिवसेना आणि मनसेनंच शिवाजी पार्कचं मैदान राजकीय भाषणांनी गाजवलं आहे. त्यामुळे राहुल गांधी आता शिवतीर्थावर उभं राहून नेमकं काय बोलणार? मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते कोणती घोषणा करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget