एक्स्प्लोर
एकनाथ शिंदेंकडून सायन-पनवेल हायवेवरील खड्ड्यांची पाहणी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित तुर्भे येथील 400 मीटरचा रस्ता येतो. याच ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम झाल्याने खड्ड्यांचं साम्राज्य तयार झालं आहे.

नवी मुंबई : खड्ड्यांमुळे आतापर्यंत दोन जणांना प्राण गमवावे लागल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सायन-पनवेल हायवेला भेट दिली. खड्डे पाहून या रस्त्याचं काम सहा महिन्यांपूर्वी झालं आहे यावर एकनाथ शिंदेंनाही विश्वास बसला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित तुर्भे येथील 400 मीटरचा रस्ता येतो. याच ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम झाल्याने खड्ड्यांचं साम्राज्य तयार झालं आहे. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
खड्ड्यांमुळे दोन दुचाकीस्वारांना आपला जीवही गमवावा लागला. अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे संकेत एकनाथ शिंदे यांनी दिले. शिवाय अपघातामुळे मृत्यू झाल्याने दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, येणाऱ्या काही महिन्यात डांबराचा असलेल्या या रस्त्याचं काँक्रेटीकरण करणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांचीही पाहणी सततच्या पावसामुळे ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत पडलेले खड्डे पाहण्यासाठी आज स्वतः पालकमंत्री एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरले. खड्ड्यांमुळे लोकांचा जीव जात असून संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचा इशारा त्यांनी दिला. हद्द कोणाची हे न बघता युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचे आदेश त्यांनी महापालिका, एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीला दिले.
खड्ड्यांमुळे दोन दुचाकीस्वारांना आपला जीवही गमवावा लागला. अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे संकेत एकनाथ शिंदे यांनी दिले. शिवाय अपघातामुळे मृत्यू झाल्याने दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, येणाऱ्या काही महिन्यात डांबराचा असलेल्या या रस्त्याचं काँक्रेटीकरण करणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांचीही पाहणी सततच्या पावसामुळे ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत पडलेले खड्डे पाहण्यासाठी आज स्वतः पालकमंत्री एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरले. खड्ड्यांमुळे लोकांचा जीव जात असून संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचा इशारा त्यांनी दिला. हद्द कोणाची हे न बघता युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचे आदेश त्यांनी महापालिका, एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीला दिले. आणखी वाचा























