एक्स्प्लोर
Advertisement
CAA Protest | देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात नागरिक रस्त्यावर; अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण
देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एआरसी याविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातही अनेक मोठ्या शहरात याचे पडसाद पाहायला मिळाले. उत्तर प्रदेशची राजधानी लखौमध्ये नागरिकत्व कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे
मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यासह देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत. उत्तर प्रदेश, लखनौमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांकडून दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड केल्याचे प्रकार झाले आहेत. देशभरातील डाव्या संघटनांनी आज देशभर एल्गार पुकारला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. काही ठिकाणी संचारबंदी तर, अनेक मुख्य शहरांत इंटरनेट बंद करण्यात आलं आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर -
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यातील अनेक शहरांत लोक रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले असून शांततेत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला राजकीय नेत्यांसह काही बॉलिवुड सेलीब्रीटींनीही उपस्थितीत लावल्याचे पाहायला मिळाले. या अगोदर नाशिकच्या मालेगावमध्येही मुस्लीम समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी मालेगावमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. नागपूर विधानसभा भवनावरही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शांततेत मोर्चा काढण्यात आला. याशिवाय मालेगाव, उस्मानाबाद, नाशिक, जळगाव, मनमाड, अमरावतीसह इतर ठिकाणी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शनं होत आहेत.
दिल्लीमध्ये आंदोलन -
जामिया विद्यापीठात घडलेल्या हिंसाचारानंतर दिल्लीतील परिस्थिती तणावाची झाली आहे. दिल्लीमध्ये आज डाव्या संघटनांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, त्याआधी सकाळी राजघाटावर हिंदू संघटनांनी या कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
लखनौमध्येही मोर्चा -
देशभरातील आंदोलनाची तीव्रता सध्या उत्तरप्रदेशमध्ये अधिक असल्याचे पाहायला मिळाले आहे. उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये दुपारी 2 वाजल्यापासून डाव्या संघटनांचं आंदोलन सुरु झाले आहे. या आंदोलनाला लखनौमध्ये हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांकडून अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना केल्या आहेत. पोलीसांचे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आंदोलकांकडून पोलिस, वाहनं, अग्निशमन दलाच्या गाड्या लक्ष्य करण्यात आल्या. तर, अनेक ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या. याशिवाय भोपाळ, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नई, आणि जम्मूमध्येही आंदोलने सुरु आहेत.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा -
पुण्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. भारतीय जनता पक्षाशी सलंग्नित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून याचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात अनेक विद्यार्थी-विद्यार्थींनींनी सहभाग घेतला आहे. यावेळी कायद्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. याअगोदर राजधानी दिल्लीतही काही हिंदू संघटनांनी या कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढला आहे.
वाचा - BLOG | नागरिकत्व कायद्याला विरोध यासाठी होतोय...
Shahi Imam | मुस्लिमांनी घाबरु नये, नागरिकत्व कायद्याचा आपल्याशी संबंध नाही : शाही इमाम | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
धाराशिव
निवडणूक
निवडणूक
Advertisement