एक्स्प्लोर

विरोधकांनी आरोप केले म्हणून राजीनामा देणार नाही : प्रकाश मेहता

'माझं काम नैतिक की अनैतिक हे मुख्यमंत्री ठरवतील. मुख्यमंत्री ठरवतील ते बघू.'

मुंबई : मुख्यमंत्र्यांचं नाव वापरुन खासगी बिल्डरला एफएसआय आंदण देण्याचा प्रयत्न करणारे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची मुख्यमंत्र्यांनी पाठराखण केली आहे. फाईलवर निर्णय झालाच नाही, त्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्नच नाही. चौकशी करुनच त्यावरचा निर्णय घेऊ. असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी मेहतांना क्लीन चिट दिली आहे. पण असं असलं तरी विरोधकांनी मात्र, त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. या सर्व प्रकरणाबाबत प्रकाश मेहतांनी एबीपी माझा एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. प्रश्न : जेव्हा खडसेंवर आरोप झाले होते. त्यावेळी चौकशी होईपर्यंत मी पदापासून दूर होणार असं म्हणत त्यांनी राजीनामा दिला होता. आपण राजीनामा देणार आहात का? प्रकाश मेहता : विधानसभेत मी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पक्ष आणि मुख्यमंत्री जे काही आदेश देतील आणि पक्ष जे काही सांगेल त्या आधारावर निर्णय करु. पण काँग्रेसच्या आरोपांमुळे राजीनामा देऊ असं मला बिल्कुल वाटत नाही. आम्ही विरोधी पक्षात होतो. अनेकदा आम्ही आरोप केला. तेव्हा यांनी सगळ्यांचे राजीनामे घेतले? त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण किंवा विरोधी पक्षाला राजीनामा मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. प्रश्न : तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या नावे फाईलवर शेरा लिहला हे तुम्हाला योग्य वाटतं का? प्रकाश मेहता : यासंबंधी मी सभागृहात सविस्तर भूमिका मांडली आहे. ती फाईल माझ्या ऑफिसमधून गेली नाही. त्यामुळे त्यावर कोणताही आदेश झालेला नाही. त्याच्यामुळे कोणतीही गफलत झालेली नाही. यावर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात स्पष्ट भूमिका मांडली आहे. हा नैतिकतेचा मुद्दा होऊच शकत नाही. प्रश्न : 'मी मुख्यमंत्र्यांना अवगत केलं आहे.' असा शेरा तुम्ही कसा काय लिहू शकलात? जेव्हा की त्यांना याबाबत माहित नव्हतं. प्रकाश मेहता : जेव्हा हा विषय झालेलाच नाही तर वारंवार एका वाक्यावर प्रश्न विचारत राहणं, विधानसभा आणि विधानपरिषदेत या विषयाचा अगदी स्पष्टपणे उल्लेख झाल्याने आता वांरवार त्यावर स्पष्टीकरण देणं मला योग्य वाटत नाही. प्रश्न : बांधकाम व्यवसायिकांना मदत करण्याचा तुमचा हेतू होता, असा आरोप धनंजय मुंडेंनी तुमच्यावर केला आहे. प्रकाश मेहता : धनंजय मुंडे काय म्हणतात त्यावर भाजपचं सरकार चालत नाही. त्यामुळे नैतिक आणि अनैतिक हे धनंजय मुंडेंकडून शिकण्याची गरज नाही. प्रश्न : टीका झाली नसती तर हा निर्णय पुढे झालाच असता. प्रकाश मेहता : तांत्रिकदृष्ट्या तो विषय आता रद्द झाला आहे. यापुढे त्याविषयी जेव्हा चौकशी होईल तेव्हा त्यामागची भूमिका स्पष्ट होईल. प्रश्न : तेथील जे रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की, आम्हाला 269 चौरस फुटांची घरं नको, असं आम्ही कधीही बांधकाम व्यवसायिकाला लिहून दिलं नव्हतं. प्रकाश मेहता : जर रहिवाशांनी प्रस्ताव दिला तरच यावर विचार केला जाईल, असं त्या फाईलमध्ये म्हटलं आहे. प्रश्न : पण तुम्ही म्हटलं आहे की, याप्रकरणी तुम्ही मुख्यमंत्र्यांना अवगत केलं आहे. प्रकाश मेहता : हे बघा तुम्ही परत-परत फिरून ते शब्द घेऊ नका. याबाबत मला जे बोलायचं होतं त्याबाबत मी सभागृहात सांगितलं आहे. जे निकषात बसत नाही ते विषय आमच्याकडून हाताळले जाणार नाहीत. प्रश्न : म्हणजे तुम्ही तसा शेरा लिहला होता की नाही? प्रकाश मेहता : यासंबंधी मला जे म्हणायचं होतं ते मी सभागृहात स्पष्ट केलं. प्रश्न : याप्रकरणी राजीनामा देणार आहेत की नाही?, ती नैतिकता तुम्ही पाळणार आहात का? प्रकाश मेहता : माझं काम नैतिक की अनैतिक हे मुख्यमंत्री ठरवतील. मुख्यमंत्री ठरवतील ते बघू. प्रश्न : जोपर्यंत मुख्यमंत्री सांगणार नाहीत तोपर्यंत तुम्ही या पदावरुन दूर होणार नाहीत का? प्रकाश मेहता : तुम्ही राजकीय प्रश्न विचारु नका, जर तात्विक प्रश्न असतील तर विचारा प्रश्न : तिथं जे काम सुरु होतं ते अनधिकृत होतं. नेते आणि एसआरएचे सीईओ बांधकाम व्यावसायिकाला फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप तेथील रहिवाशांनी केला आहे. प्रकाश मेहता : 2009-10 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्याबाबत निर्णय घेतले होते. प्रश्न : घाटकोपरमधील एका जमिनीबद्दलही तुमच्यावर आरोप करण्यात येत आहे की, तुम्ही धर्मेंद जैन यांना म्हाडा ट्रान्झिट कॅम्पची जागा देण्याचा प्रयत्न केला. प्रकाश मेहता : असा कुठलाही प्रकार घडलेला नाही. लोकांनी कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. विकासक नेमलेला नाही. त्यामुळे शासनानं कोणालाही प्लॉट देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. प्रश्न : तो प्लॉट धर्मेंद जैन यांना पुन्हा देण्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप विरोधकांनी सभागृहात केला आहे. प्रकाश मेहता : विरोधी पक्ष नेत्यांची माहिती अर्धवट किंवा खोटी आहे. त्यामुळे त्यांनी पूर्ण माहिती घ्यावी आणि मग बोलावं. प्रश्न : दिल्लीतून तुमच्यावर वरदहस्त आहे म्हणून तुमची खुर्ची वाचली आहे का? प्रकाश मेहता : असा काहीही विषय नाही. VIDEO :  संबंधित बातम्या :  मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांना न सांगताच 'अवगत' शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget