एक्स्प्लोर
भाजप-शिवसेनेतलं पोस्टरवॉर टोकाला, मोदींना नागोबा म्हणून हिणवलं
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदींना निजामाचं बाप म्हणून हिणवल्यावर भाजपनं पोस्टरमधून उद्धवना बेडूक आणि बरंच काही म्हणत हिणवलं. त्याचा सडेतोड समाचार आज शिवसेनेनं घेतला आहे.
सेनेच्या पोस्टरमध्ये मोदींची संभावना 'चुरणबाबा' आणि 'आयत्या बिळावरचा नागोबा' अशी केली आहे. अच्छे दिन, बिच्छे दिन काही नाही, लोकंच उत्तर देतील ह्यांना आम्हाला काही घाई नाही, तसंच विदेशात खूप झालं, जरा देशात बघा, मातोश्रीचे उपकार इतक्या लवकर विसरणारी हीच का ती नमोची भाजप? अशा आशयाचे बोचरे पोस्टर शिवसेना कार्यकर्त्यांनी तयार केले आहेत.
मुंबई पालिकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष टोकाला गेला आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर तुटून पडलेले बघायला मिळत आहेत.
दरम्यान, काल भाजप कार्यकर्त्यांनी सेनेवर टीका करणारे पोस्टर तयार केले होते. देश पिताश्रींच्या पुण्याईवर आणि मातोश्रीच्या आशीर्वादाने नाही चालत… त्यासाठी खऱ्याखुऱ्या संकटांचा सामना करावा लागतो…” अशा आशयचंही एक पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. या सर्व पोस्टर्सवर ‘i support NaMo!’ अशी ओळ आहे.
या पोस्टर्समधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची तुलना अरविंद केजरीवाल आणि दिग्विजय सिंग यांच्यासोबत केली आहे. शिवाय, वेगवेगळ्या पद्धतीने संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement