एक्स्प्लोर
Advertisement
अखिलेश, अण्णा हजारे, सुबोध भावे पोस्ट ऑफिसात नोकरीला?
मुंबई : पैसे उकळण्यासाठी घोटाळेबाज कायम नवनवीन शक्कल शोधत असतात. मुंबईतल्या कांदिवली पोस्ट ऑफिसमध्ये तर घोटाळ्याच्या सीमाच ओलांडण्यात आल्या. या पोस्ट ऑफिसमध्ये चक्क राजकारणी आणि समाजसेवकांनाच कामावर ठेवण्यात आलं आहे. अखिलेश यादव, भाजपचे आमदार राम कदम, राष्ट्रवादीचे अजित पवार इथं काम करत असल्याचं दाखवण्यात आलं.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पोस्ट ऑफिसात डिलीव्हरी बॉय! अण्णा हजारेंना पोस्ट ऑफिसात 7 हजार पगार... हे ऐकून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल, पण मुंबईतील कांदिवलीच्या समता नगर पोस्ट ऑफिसमध्ये ही हेराफेरी झाली आहे.
कंत्राटी पद्धतीवर जवळपास अडीचशे तरुणांना पोस्ट ऑफिसमध्ये कामावर ठेवण्यात आलं. वर्षभर काम पूर्ण झाल्यावर अशा तरुणांना सेवेत कायम करावं लागतं. मात्र 12 पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी खिसा गरम करण्यासाठी शक्कल लढवली. काम करणाऱ्या व्यक्तींची नावं दर महिन्याला बदलण्यात आली. माहिती अधिकारामुळे ही बाब समोर आली आहे.
या तरुणांचं नामकरणही नेते आणि समाजसेवकांच्या नावानं झालं. अनिकेत सरगडे झाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव. भिवा कदमला समाजवादी पार्टीचे नेते रामगोपाल यादवचं नाव देण्यात आलं. संजय गिजमच्या नावाखाली पैसे लाटण्यासाठी त्याला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं नाव देण्यात आलं, तर नितीन चाळके सुबोध भावे बनला.
आता हा घोटाळा समोर आल्यानंतर या तरुणांना कामावरुन काढून टाकण्यात आलं. त्यामुळे या तरुणांवर बेरोजगारीची वेळ ओढावली. या संपूर्ण घोटाळ्यात विभागीय अधिकारी एस. जैन यांचं नाव समोर येत आहे. आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते सुट्टीवर असल्याचं सांगण्यात आलं.
पोस्ट ऑफिसमध्येच भ्रष्टाचार झाल्यानं आता खळबळ उडाली आहे. त्यामुळं तरुणांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement