एक्स्प्लोर

कोरोना तपासणीची क्षमता दहापटीने वाढवण्यासाठी 'पूल टेस्टिंग'चा प्रस्ताव, राज्य सरकारचं महत्वाचं पाऊल

पूल टेस्टिंगमध्ये एकाच वेळी दहा नुमन्यांची तपासणी होऊ शकते. जर हे शक्य झालं तर उरलेल्या लाॅकडाऊनच्या काळात वेगाने तपासण्या होण्यास मदत होईल.

मुंबई : कोरोना तपासणीची क्षमता दहापटीने वाढवण्यासाठी 'पूल टेस्टिंग'चा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. कोविड 19 च्या चाचण्यांना वेग यावा यासाठी राज्य सरकारनं हे महत्वाचं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारने केंद्र आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) कडून पूल तपासणीसाठी परवानगी मागितली आहे. पूल टेस्टिंगमध्ये एकाच वेळी दहा नुमन्यांची तपासणी होऊ शकते. जर हे शक्य झालं तर उरलेल्या लाॅकडाऊनच्या काळात वेगाने तपासण्या होण्यास मदत होईल. महाराष्ट्रात पूल टेस्टिंगमुळे तपासणीचा वेग दहा पट वाढेल. सध्या राज्यात रोज 4 ते 5 हजार तपासण्या करण्यात येत आहेत. इस्त्रायल आणि यूएसच्या काही भागात कोरोना चाचणीसाठी पूल टेस्टिंगचा वापर करण्यात आला आहे. कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी  कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन,15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज आणि आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन म्हणजेच हरित पट्टयात समाविष्ट होतील. लॉकडाऊनसंदर्भात रेड झोनमधील जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांमध्ये खबरदारीची उपाययोजना करून उद्योग आणि व्यवहार सुरू करण्याचे स्पष्ट संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. एकंदरीतच देशाता सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने सरकार सर्वोतापरी खबरदारी घेत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येनुसार महाराष्ट्राची रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये विभागणी; पाहा तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? तुम्ही कोणत्या झोनमध्ये येतात? रेड झोन : मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड सांगली, औरंगाबाद ऑरेंज झोन : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोदिया ग्रीन झोन : धुळे, नंदूरबार, सोलापूर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली महाराष्ट्रातल्या कोरोना बाधितांचा मृत्यूदर अधिक का? महाराष्ट्रातल्या कोरोना बाधितांचा मृत्यूदर हा अधिक आहे. तो जगाच्या सरासरीहून अधिक होत चालला आहे आणि देशाच्या सरासरीचा दुपटीहून अधिक झाला आहे. आजचं चित्र जर आपण बघितलं तर जगाचा मृत्यूदर हा 6 पूर्णांक 19 आहे. देशामध्ये कारोना बाधितांची आजची संख्या 8 हजार 356 आहे. त्यापैकी 273 रुग्णांचा मृत्यू झालाय. आहे हे प्रमाण 3 पूर्णांक 27 टक्के आहे. महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण 7 पूर्णांक 21 टक्के आहे. म्हणजे जवळपास देशाचा दुप्पट. महाराष्ट्रातले कोरोना बाधित मृत्यूमुखी पडण्याचं महत्त्वाचं कारण रक्तदाब, मधुमेह, अस्थमा सारखे रोग आहेत. हे रूग्ण कोरोनावरच्या प्रत्यक्ष उपचारादरम्यान नियंत्रणात आणण्यात आपल्या यंत्रणेला अपयश येत आहे अशी वैद्यकीय क्षेत्रात चर्चा आहे.VIDEO | लॉकडाऊन गांभीर्याने घेतला नाही तर 30 एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आयुष्यभर माझं नाव घ्या मला काहीच फरक पडत नाही, मोहोळांचा शेट्टींसह धंगेकरांवर हल्लाबोल, म्हणाले घोषणाबाजी करणारे लोक कोणीतरी सोडलेले 
आयुष्यभर माझं नाव घ्या मला काहीच फरक पडत नाही, मोहोळांचा शेट्टींसह धंगेकरांवर हल्लाबोल, म्हणाले घोषणाबाजी करणारे लोक कोणीतरी सोडलेले 
Gopal Badne : मोठी बातमी, फलटण डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील निलंबित PSI गोपाळ बदने फलटण पोलीस स्टेशनला हजर
मोठी बातमी, निलंबित PSI गोपाळ बदने फलटण पोलीस स्टेशनला हजर
जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव, प्रश्नांचा भडीमार, जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी 
जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव, प्रश्नांचा भडीमार, जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Life Savers Training: रस्त्यावर अपघात झाल्यास 'ते' ठरतील देवदूत, Mumbai Police साठी विशेष प्रशिक्षण
Mumbai Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
Attack on Press: 'बातमी दाखवल्यास जीवे मारू', ABP Majha चे पत्रकार Suresh Kate यांना Kalyan मध्ये गावगुंडांची धमकी
Hospital Negligence : पनवेलमध्ये मृतदेहांची अदलाबदल, एका कुटुंबाने दुसऱ्याच मृतदेहावर केले अंत्यसंस्कार!
Mira Road Clash: 'कोण तो Waris Pathan? त्याचा काय संबंध?', Pratap Sarnaik बाहेरच्या नेत्यांवर संतापले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आयुष्यभर माझं नाव घ्या मला काहीच फरक पडत नाही, मोहोळांचा शेट्टींसह धंगेकरांवर हल्लाबोल, म्हणाले घोषणाबाजी करणारे लोक कोणीतरी सोडलेले 
आयुष्यभर माझं नाव घ्या मला काहीच फरक पडत नाही, मोहोळांचा शेट्टींसह धंगेकरांवर हल्लाबोल, म्हणाले घोषणाबाजी करणारे लोक कोणीतरी सोडलेले 
Gopal Badne : मोठी बातमी, फलटण डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील निलंबित PSI गोपाळ बदने फलटण पोलीस स्टेशनला हजर
मोठी बातमी, निलंबित PSI गोपाळ बदने फलटण पोलीस स्टेशनला हजर
जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव, प्रश्नांचा भडीमार, जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी 
जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव, प्रश्नांचा भडीमार, जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
GST Registration : 1 नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार, फक्त 3 दिवसात मंजुरी मिळणार, निर्मला सीतारामन यांची माहिती
1 नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार, फक्त 3 दिवसात मंजुरी मिळणार
Phaltan Crime : फलटण डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी नवी अपडेट, संशयित आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडीत रवानगी 
फलटण डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी नवी अपडेट, संशयित आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडीत रवानगी 
Actor Satish Shah Passed Away: बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
Embed widget