एक्स्प्लोर
पोलिस आणखी स्मार्ट होणार, खाकी वर्दी इतिहास जमा होणार
देशभरातील पोलिस सध्या ब्रिटीशकालीन खाकी वर्दी परिधान करत आहेत. आता पोलिसांना सर्व हवामानात आरामदायी ठरणारा डिझायनर गणवेश दिला जाणार आहे.
मुंबई : देशभरातील पोलिसांची खाकी वर्दी आता इतिहासजमा होणार आहे. पोलिसांच्या गणवेशात लवकरच बदल करण्यात येणार आहेत. आपले पोलिस कर्मचारी आता स्मार्ट युनिफॉर्ममध्ये दिसतील.
देशभरातील पोलिस सध्या ब्रिटीशकालीन खाकी वर्दी परिधान करत आहेत. आता पोलिसांना सर्व हवामानात आरामदायी ठरणारा डिझायनर गणवेश दिला जाणार आहे. अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या संस्थेकडे हे काम सोपवण्यात आलं आहे. ही संस्था सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशातील पोलिस आणि निमलष्करी दलासाठी नवा गणवेश बनवणार आहे.
ब्युरो ऑफ रिसर्च अँड डिवेलपमेंटच्या सहकार्याने वर्दीचे 9 नमूने तयार करण्यात आले आहेत. यात शर्ट, पॅण्ट, पट्टा, टोपी आणि जॅकेटचा समावेश आहे. याशिवाय रेनकोट आणि हेडगिअरचं डिझाईनही बनवलं आहे. हे डिझाईन सर्व राज्यांच्या पोलिसांना शेअर केलं आहे, जेणेकरुन ते आपल्या पसंतीने गणवेश निवडू शकतात.
नऊ राज्यांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांनुसार, सध्याच्या वर्दीमध्ये अनेक अडचणी आहेत. पहिली बाब म्हणजे देशातील पोलिसांच्या वर्दीत समानता नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांच्या गणवेशाचं कापड फारच जाड असल्याने उन्हाळ्यात त्रास होता. याशिवाय वर्दीत जास्तीत जास्त गोष्टी ठेवण्याची पर्यायी जागा नाही.
पोलिसांची टोपी लोकराची असल्याने उन्हाळ्यात डोकेदुखीचं कारण ठरते. तर हेल्मेट एवढे जड आहेत की आपत्कालीन परिस्थितीत ते घालणं अडचणीचं ठरतं. पट्टाही फार जड असल्याने तो घालून वाकता येत नाही. जगभरातील इतर देशांमधील पोलिसांच्या पट्ट्यात फोन ठेवण्याची जागा आणि स्मार्ट कीज असते, तशीच सोय देशातील पोलिसांच्या गणवेशात असावी.
बुटंही पोलिसांसाठी एक समस्या बनली आहे. चामड्याची बुटं जास्त वेळ घालणं सोपं नसतं. या खाकी रंग प्रायव्हेट एजन्सी आणि इतर विभागातील लोकही वापरतात. आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर म्हणाल्या की, "खाकी वर्दीवर फारच टीका होते. यात बदल होणं आवश्यक आहे. सध्याची वर्दी पोलिसांसाठी सर्व प्रकारच्या हवामानात परिधान करण्यासाठी योग्य नाही. याला पर्याय आणणं गरजेचं आहे."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement