मीरा रोड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी कोरोनामुक्त
मिरा रोड येथे राहणा-या एका पोलीस कर्मचा-यांचा यावेळी मीरारोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप कदम व इतर पोलिस कर्मचारी तसेच त्यांच्या राहत्या इमारतीतील रहिवासी यांनी त्यांचे फूल व हार घालून स्वागत केले.
मुंबई : मीरारोड पोलिस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांना 7 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी या सर्वांना घरी सोडण्यात आले. मिरा रोड येथे राहणा-या एका पोलीस कर्मचा-यांचा यावेळी मीरारोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप कदम व इतर पोलिस कर्मचारी तसेच त्यांच्या राहत्या इमारतीतील रहिवासी यांनी त्यांचे फूल व हार घालून स्वागत केले.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मीरा भाईंदर मधील पोलीस दलातही कोरोनाने शिरकाव केला आहे. मीरारोड पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वीच दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांच्या स्वॅब नमुन्यांच्या तपासणीतून निष्पन्न झाले होते. हे कर्मचारी नाकाबंदीच्या ठिकाणी अनेकांच्या संपर्कात आल्याने मीरारोड पोलीस ठाण्यातील सुमारे 30 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन ची घोषणा करत सगळीकडे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आपल्या जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस चोखपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत. आतापर्यंत मिरा भाईंदर मध्ये एकाही पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली नव्हती. मात्र मिरारोड येथील दोन पोलीस कर्मचारी एस के स्टोन, सिनेमॅक्स किंवा इतर ठिकाणी नाक्यावर बंदोबस्त करत होते. या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांना वेळोवेळी स्वतःला सॅनिटाईज करण्यासाठी वरिष्ठांनी विशेष वाहनाची व्यवस्था केली असली, तरी नाकाबंदी दरम्यान अनेक पोलीस कर्मचारी लोकांच्या संपर्कात येत असल्याने त्यांना कोरोनाचा धोका सर्वाधिक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तर पोलिसांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन मिरा रोडचे पोलीस निरीक्षक संदिप कदम यांनी केलं आहे.
संबंधित बातम्या :
कौतुकास्पद! नगर जिल्ह्यातील पहिले आदर्श गाव हिवरे बाजार अद्याप कोरोनामुक्त
पिंपरी चिंचवडमध्ये दीड महिन्याच्या चिमुकल्यासह चार वर्षाच्या बाळाची कोरोनावर मात
Health survey in Shirdi | शिर्डीत आरोग्याचा ‘प्रवरा पॅटर्न’ कोरोनाच्या लढ्यात लक्षवेधी | स्पेशल रिपोर्ट