एक्स्प्लोर

पिंपरी चिंचवडमध्ये दीड महिन्याच्या चिमुकल्यासह चार वर्षाच्या बाळाची कोरोनावर मात

पिंपरी चिंचवड मधील दीड महिन्याच्या चिमुकल्यासह चार वर्षाच्या बाळाने कोरोनाला हरवलं आहे. आजोबांच्या संपर्कात आल्याने या दोघांना कोरोनाची लागण झाली होती.

पिंपरी चिंचवड : कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातचं सर्वांचं मनोबल वाढवणारी एक सकारात्मक घटना शहरात घडली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून कोरोना बाधित दीड महिन्याच्या बाळाला आणि त्याच्या 4 वर्षाच्या मोठ्या भावास 14 दिवसांच्या उपचारानंतर सुखरूप घरी सोडण्यात आले. ते दोघेही कोरोना पॉझिटीव्ह होते, ते संभाजीनगर, चिंचवड येथील रहिवासी आहेत.

मुंबईला डिलिव्हरीला गेलेली आई एक महिन्यांनी पुण्याला परत आली. पण, बाळाला ताप आल्यामुळे वाय.सी.एम.रुग्णालय येथे दाखल केले होते. तेथे तपासणी केली असता बाळ व मोठा भाऊ दोघेही पॉझिटीव्ह आले. तसेच आजोबा सुद्धा पॉझिटीव्ह आले होते. तर आईचा अहवाल निगेटीव्ह आला होता. यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील बालरोग विभागात त्यांच्यावर उपचार केले. त्यातून ते संपूर्ण बरे झाले आहेत. या दीड महिन्याच्या बाळासह त्याच्या चार वर्षांच्या भावाला पूर्ण बरे करण्यासाठी वैद्यकिय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे व डॉ. अनिकेत लाठी यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग विभाग प्रमुख डॉ. दीपाली अंबिके, वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या हरिभक्त, डॉ. सीमा सोनी, डॉ सूर्यकांत मुंडलोड,डॉ. नुपूर कत्रे, डॉ. शीतल खाडे, डॉ. प्राजक्ता कदम, डॉ. गौरव शर्मा, डॉ. सबाहत अहमद, डॉ.अभिजीत ब्याले, डॉ. रिजवना सय्यद, डॉ. कोमल बिजारनिया व सर्व परिचारिका यांचे सहकार्य लाभले.

पुणेकरांनो जेवण ऑनलाईन मागवताना सावधान! नामांकित हॉटेलच्या नावाने सोशल मीडियावर बनावट जाहिराती

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात पुणे, पिंपरी चिंचवडला सूट नाही लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील नियम व अटी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. यात रेड झोन मधील जिल्ह्यांमध्ये फार थोड्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. दरम्यान, झोन ठरवण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहे. रेड झोन, ऑरेंज झोन, ग्रीन झोन, कंटेनमेंट झोनबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार त्या-त्या राज्यांना असणार आहेत. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तशी मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियामावलीचं पालन करणे सर्व राज्यांना बंधनकारक असणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये फक्त जीवनाश्यक गोष्टींना परवानगी असेल. रात्री 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे. फक्त जीवनाश्यक गोष्टींना परवानगी असेल.

Coronavirus | पुण्यात रात्रीतून कोरोनाच्या 71 रुग्णांची नोद; जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 3866वर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवादMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget