(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Night Curfew | संचारबंदीबाबत संभ्रम; जाणून घ्या कशासाठी मुभा, कशावर बंदी
रात्रीच्या वेळी असणारी संचारबंदी म्हणजे घराबाहेर पडायचंच नाही का, असा प्रश्नही अनेकांना पडला. ज्याबाबत आता पोलीस यंत्रणांकडून काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
Night Curfew लागू केल्यानंतर या नियमांचं पालन करण्यास राज्यात सुरुवात झाली. विशेषत: हे नियम लागू करण्यात आल्यांनंतर मुंबईत याचे थेट परिणाम दिसून आले. ज्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये काही प्रमाणात संभ्रमही पाहायला मिळाला. रात्रीच्या वेळी असणारी संचारबंदी म्हणजे घराबाहेर पडायचंच नाही का, असा प्रश्नही अनेकांना पडला. ज्याबाबत आता पोलीस यंत्रणांकडून काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
मुंबईत संचारबंदी असली तरीही नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा असल्याचं पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या निवेदनात सांगण्यात आलं आहे. बरं, बाहेर पडण्याची मुभा असली तरीही गर्दी करु नका असा इशाराही देण्यात आला आहे.
संचारबंदीदरम्यान चारपेक्षा अधिक जण कोणत्याही ठिकाणी जमल्याचं आढळून आल्याचं आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असाही इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी संचारबंदीच्या बाबतीच महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
CoronaVirus Lockdown | प्रियांका चोप्रासह काही मराठी सेलिब्रिटीही युकेमध्ये अडकले
अत्यावश्यक सेवांना संचारबंदीतून वगळण्यात आलं असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. शिवाय रात्रपाळीची कार्यालयं वगळता पब, हॉटेल, सिनेमागृह अशा करमणुकीसाठी वापरली जाणारी आस्थापनं रात्री अकरा वाजता बंद करणं बंधनकारक असल्याचंही या निवेदनामार्फत स्पष्ट करण्यात आलं.
संचारबंदीच्या या काळात नेमकी कशाला मुभा आणि कशाला बंदी?
काही दिवसांपूर्वीच नाईट कर्फ्यू बाबतची नियमावली जाहीर करण्यात आली, ज्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळाला. रात्रीची संचारबंदी असल्यामुळं घराबाहेरच पडण्यास मज्जाव आहे का असा प्रश्न अनेकांना चिंतेत टाकून गेला. पण, आता मात्र हे चित्र स्पष्ट होत आहे.
- नागरिकांनी पूर्णपणे घराबाहेर पडणं टाळावं अशी सक्ती नाही.
- अत्यावश्यक किंवा इतर कारणासाठी एक- दोनजण बाहेर पडण्यास मुभा.
- दुचाकी किंवा कारमधून प्रवास करण्यास मुभा शकतात. पण, कारमध्ये चारहून जास्त लोकं नसावीत.
- कामावरुन घरी परतणाऱ्यांना अकरा वाजल्यानंतरही घरी परतण्यास परवानगी.
- अत्यावश्यक सेवांतील गाड्यांना कोणत्याही बंदीची सक्ती नाही.
काही महत्त्वाचे नियम आणि सावधगिरी या दोन निकषांच्या आधारे कोरोना निर्बंधांचं पालन करावं हे मात्र पोलीस यंत्रणांना अपेक्षित आहे. नागरिकांनीही नियम सक्तीचे नसले तरी अत्यावश्यक कारण वगळता घराबाहेर पडू नये असं आवाहन सातत्यानं करण्यात येत आहे.