एक्स्प्लोर
Advertisement
वरिष्ठांना व्हॉट्सअॅप ग्रुपवर शिवीगाळ, मुंबई पोलीस दलातील पीआय निलंबित
मुंबई पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षकाला व्हॉट्सअॅप ग्रुप वर वरिष्ठांना शिवीगाळ आणि अवमानकारक मेसेज लिहिणं चांगलंच महागात पडलं आहे. या पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे.
मुंबई : मुंबई पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षकाला व्हॉट्सअॅप ग्रुप वर वरिष्ठांना शिवीगाळ आणि अवमानकारक मेसेज लिहिणं चांगलंच महागात पडलं आहे. स्वतः विरुद्ध झालेल्या कारवाईचा राग व्हॉट्सअॅप ग्रुप वर आपल्या वरिष्ठांना आक्षेपार्ह भाषेचा वापर करून व्यक्त केला. ज्यामुळे या पोलीस निरीक्षकाला सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. या पोलिस अधिकाऱ्याचे नाव अनुप डांगे असून ते गावदेवी पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत होते.
काय आहे प्रकरण...
23 नोव्हेंबर 2019 रोजी दक्षिण मुंबईतील ब्रीच कॅंडी या परिसरात असलेल्या डर्टी बन पबमध्ये भांडण सुरू असल्याचा पोलिसांना कॉल आला. त्यावेळेस अनुप डांगे हे रात्रपाळीला होते. डांगे आपल्या पथकासोबत पबमध्ये पोहोचले आणि यासंदर्भात गुन्ह्याची नोंद केली. मात्र या गुन्ह्याची नोंद करताना डांगे यांनी त्या भांडणाचे वेळी उपस्थित नसलेल्या एका व्यक्तीचे नाव या गुन्ह्यात नोंदवण्याचे आदेश दिले. हा प्रकार समोर आल्यानंतर डांगे यांना दक्षिण प्रादेशिक विभागातील कंट्रोल रूममध्ये संलग्न करण्यात आले. डांगे या बदलीमुळे संतापले होते आणि वरिष्ठांचा राग मनात ठेवून होते.
गावदेवी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. या ग्रुपचं नाव "गावदेवी ऑफिसर्स" असं आहे. या ग्रुपमध्ये डांगे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध आक्षेपार्ह, अवमानकारक आणि चारित्र्याबाबत भाष्य करणारा मेसेज पाठवला. हा मेसेज व्हॉट्सअॅप ग्रुपच्या बाहेर पोहोचला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पर्यंत ही बाब पोहोचली.
असा प्रकार पुन्हा होऊ नये
या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डांगे यांना सेवेतून निलंबित केलं. शिस्तप्रिय दल असणारा असा मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल असं वक्तव्य करणं हे चुकीचं असून त्यामुळंच ही कारवाई करण्यात आल्याचं कळत आहे. तसेच यापुढे असा प्रकार पुन्हा होऊ नये याची सुद्धा दक्षता घेण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement