एक्स्प्लोर
Advertisement
डहाणूत जखमी कासवाच्या पायावर फिजिओथेरपी
डहाणू समुद्रकिनाऱ्यावर दोन महिन्यांपूर्वी जखमी अवस्थेत आढळलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाचं बच्चू असं नामकरण करण्यात आलं होतं.
मुंबई : डहाणूमध्ये असलेल्या 'सी टर्टल ट्रीटमेंट अँड ट्रान्झिट सेंटर'मध्ये एका कासवाला चक्क फिजिओथेरपी देण्यात आली. डहाणू समुद्रकिनाऱ्यावर दोन महिन्यांपूर्वी जखमी अवस्थेत आढळलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाचं बच्चू असं नामकरण करण्यात आलं होतं.
पुढच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने या कासवाची त्या पायाची हालचाल पूर्णपणे मंदावली होती. त्यामुळे कासव चालू किंवा पाण्यात पोहूही शकत नव्हतं. यावेळी शुश्रूषा केंद्रात कासवावर पशुवैद्यकांनी फिजिओथेरपीद्वारे विविध व्यायाम करुन घेतले.
केंद्रातील डॉ. दिनेश विन्हेरकर यांनी या कासवाच्या पिल्लावर उपचार करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान कासवाच्या पायाला शेक देऊन, विविध व्यायाम करुन, हालचाल न होणाऱ्या पायाला कार्यान्वित करण्यात आलं.
या केंद्रात असा प्रयोग पहिल्यांदाच झाला असून एका कासवाला पुन्हा त्यांनी चार पायांवर चालायला आणि पोहायला तयार केलं आहे. आता या कासवाला पुढील दोन आठवड्यात पुन्हा समुद्रात सोडलं जाणार आहे.
डहाणूमधील 'सी टर्टल ट्रीटमेंट अँड ट्रान्झिट सेंटर' मध्ये ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवावर चक्क फिजिओथेरपीद्वारे उपचार. कासवाच्या हालचाल मंदावलेल्या जखमी पायावर फिजिओथेरपी उपचार करून कासवाच्या पायाला पुन्हा कार्यन्वित करण्याचा अनोखा प्रयोग @abpmajhatv pic.twitter.com/lFabxXSG7X
— Vedant Neb (@NebVedant) October 12, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
सोलापूर
Advertisement