इंधन दरवाढ सुरूच, पेट्रोल 18 पैशांची तर डिझेल 21 पैशांनी महागलं
मुंबईत आज पेट्रोलचे दर 90 रुपये 75 पैसे, तर डिझेलचा दर 79 रुपये 21 पैसे इतका आहे..
मुंबई : सप्टेंबर महिन्यात सुरू झालेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची मालिका महिनाअखेरीस कायम आहेत. पेट्रोलच्या दरात 18 पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेल 21 पैशांनी महागलं आहे. राज्यभरातील अनेक शहरांत यापूर्वीच पेट्रोलनं नव्वदी ओलांडली आहे. तर डिझेलचे दरही 80 रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. मुंबईत आज पेट्रोलचे दर 90 रुपये 75 पैसे, तर डिझेलचा दर 79 रुपये 21 पैसे इतका आहे..
पेट्रोलची शतकाकडे वाटचाल सुरुच आहे, पण सरकारी पातळीवर दरवाढ रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. राज्यात देशातलं सर्वात महाग पेट्रोल मिळत आहे. डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्चही वाढत आहे, ज्याचा परिणाम महागाईवर होतोय.
कोणत्या जिल्ह्यात काय दर?
मुंबई महानगर क्षेत्र
जिल्हा पेट्रोल दर डिझेल दर (प्रति लिटर)
पालघर 90.60 77.85
मुंबई उपनगर 90.75 79.23
मुंबई शहर 90.75 79.23
ठाणे 90.83 79.33
पश्चिम महाराष्ट्र
अहमदनगर 90.61 77.90
कोल्हापूर 90.90 78.19
पुणे 90.52 78.79
सांगली 90.64 77.94
सातारा 91.22 78.47
सोलापूर 91.80 79.85
मराठवाडा
औरंगाबाद 91.80 80.29
बीड 91.49 78.74
हिंगोली 91.51 78.78
जालना 91.56 78.80
लातूर 91.44 78.70
नांदेड 92.31 79.54
उस्मानाबाद 91.13 78.40
परभणी 92.52 79.72
विदर्भ
अकोला 90.57 77.83
अमरावती 92.00 80.52
भंडारा 91.53 78.79
बुलडाणा 91.17 78.45
चंद्रपूर 90.55 77.82
गडचिरोली 90.73 78.04
गोंदिया 91.80 79.05
नागपूर 91.23 79.76
वर्धा 90.93 78.22
वाशिम 91.23 78.51
यवतमाळ 91.76 79.02
कोकण
सिंधुदुर्ग 91.64 78.90
रायगड 90.77 78.00
रत्नागिरी 91.75 79.01
उत्तर महाराष्ट्र
धुळे 90.65 77.94
जळगाव 91.70 78.93
नंदुरबार 91.37 78.63
नाशिक 91.10 78.36