एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भिडेंच्या आंब्याच्या विधानानंतर सोशल मीडियावर विनोदाचा पाऊस
संभाजी भिडे यांच्या या विधानाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. आंब्याचा आधार घेत विनोदांचा वर्षाव अक्षरश: सुरु आहे.
मुंबई : "माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते," असं अजब दावा श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केलं.
भिडेंनी सभेत शिवकालीन इतिहासाचे दाखले देत सध्याची सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केलेच, पण आपल्या शेतातील आंब्याचे दाखलेही दिले. हे आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी केला.
संभाजी भिडे यांच्या या विधानाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. आंब्याचा आधार घेत विनोदांचा वर्षाव अक्षरश: सुरु आहे. नेटकऱ्यांच्या फेसबुकीय प्रतिभेला जणू धुमारेच फुटले आहे. भिडेंच्या विधानावर कोण चांगला विनोद करतो, ह्याची चढाओढच सुरु आहे. इतकंच नाही तर 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील पारु अर्थात लक्ष्याच्या आंबा खाऊन गरोदर झाल्याचा सीनही भिडेंच्या विधानानंतर पुन्हा शेअर केला जात आहे.
भिडेंच्या विधानांवरील जोक्स
शाबु खिचडीला मागे टाकत,
आंब्याची पहिल्या क्रमांकावर उडी ..
आंब्याचे भाव गगनाला भिडले .
#आता युद्ध अटळ....
रामदेव बाबा आणि आमदेव बाबा म्हंजी आपली आंबाजी भिडे म्हंजी भिडे गुर्जी हो, आता एकत्र येऊन आंब्याचं पेटंट घीऊन एकत्र बिझनेस करणार म्हणं आंब्याचा.
खा गुर्जीचा पंतजली आंबा नि वाढवा वंशाचा दिवा...
मग आता "हापूस" की "बापूस"....????
"त्या" आंब्याला "बापूस" आंबा म्हणावे.
भिडेच्या बागेतील आंबा खाल्ल्याने मुले होतात, हा जागतिक शोध आहे. नोबेल साठी प्रस्ताव करायला हवा.
आंब्याची नवीन प्रजाती विकसित झालीय म्हणे भुर्जी मँगो
आज दोन शब्द शिकायला मिळाले.
१. आमसूत्र
२. गुरुवीर्य
शेजारच्या आजोबांनी आज्जीच्या कानाखाली वाजवली. का? तर म्हणे बाजारात जाणाऱ्या आजोबांना आजी 'आंबे घेऊन या' असे म्हणाली.
ऑटोमॅटिक सायंटिस्टने शोधले आंब्याचे नवीन वाण..आंबे खाल्याने होतात मुले
...घ्या आफत, माझ्या शेतातला आंबा खाल्ल्याने जोडप्यांना मुलं होतात - भिडे
'बनवाबनवी'मध्ये लक्ष्याला (पारुला) दिलेला आंबा कदाचित यांच्याच शेतातला असेल
मागे एक न्यायाधीश म्हणाले होते, "लांडोर मोराचे अश्रू पिते म्हणून तिला पिलं होतात." आता #भिडे_गुरुजी म्हणतात,
"त्यांच्या शेतातील #आंबे खाऊन #मुलं होतात" एका मित्राने फोन केला, म्हणाला, गड्या आत्ता लक्षात आले... #नाचरे_मोरा_आंब्याच्या_वनात हे खरंच "बाळ"गीत आहे.... मी ऊत्तरलो, गड्या, लईच #आंबट ईनोद तुझा
"कार्टे, या वयात कुठं तोंड काळ केलंस, खरं खरं सांग..." ????
"???????????????? अग आय तुझी शपथ... मी तर फक्त त्या शेतातला आंबा ???? खाल्लेला ????????????"
जोकिंग न्यूज...
हापूस-पायरी-केशर अशा सगळ्या आंब्याचे भाव कोसळले!
#गुर्जीनचा आंबा बाजारात दाखल!
विक्की डोनर पहिला होता, आता आंबा डोनर पण लवकर प्रेक्षकांच्या भेटीला...????????????????
साखरांबा, मुरंबा, गुळांबा हे शब्द व पदार्थ माहित होते.
त्यात 'मुलंबा' या नवीन शब्दाची भर . . .
संभाजी भिडे काय म्हणाले?
संभाजी भिडे म्हणाले की, "भगवंताची कृपा आहे ही मला एक कोय मिळाली. त्या कोईचं रोपटं करुन आता त्याचं झाडं झालं. ते आंब्याचं झाड माझ्याकडे आहे. त्याची काय मजा आहे, ते सांगतो तुम्हाला. अहो, लग्न होऊन 8-8, 10-10, 12-12 वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. असं झाड आहे माझ्याकडे. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत. ती पद्धत शिकवली, पथ्य सांगितलं आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. असा हा आंबा आहे. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement