एक्स्प्लोर
पासधारक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत मोफत प्रवास, 'बेस्ट'चा निर्णय
मुंबई : ज्या विद्यार्थ्यांकडे पास आहे, पण त्यांचं परीक्षा केंद्र इतर ठिकाणी आलं आहे, त्यांना मोफत प्रवास देण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना घरापासून कुठल्याही परीक्षा केंद्रावर मोफत प्रवास करता येईल. त्यासाठी केवळ पास आणि हॉलतिकीट जवळ असणं गरजेचं आहे. शिवाय विद्यार्थ्यांना बसच्या पुढील दरवाजातून प्रवेश करण्यासाठी सुद्धा परवानगी देण्यात आली आहे, जेणे करुन विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा मिळेल. तर ठिकठिकाणी बेस्टचे अधिकारी विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये, यासाठी तैनात असतील.
राज्यभरात बारावीची परीक्षा
राज्यभरात आजपासून बारावीच्या परीक्षांना सुरूवात होत आहे. राज्यभरातून सुमारे 15 लाख 5 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यंदा मुंबई विभागातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 6 टक्क्यांनी वाढली आहे. राज्यातील एकूण 9 हजार 143 ज्युनिअर कॉलेजातील विद्यार्थी ही परीक्षा देतील.
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन
- मुंबई 0२२- २७८९३७५६,
- पुणे 0२0- ६५२९२३१६,
- नागपूर 0७१२- २५५३५0७,
- औरंगाबाद 0२४0- २३३४२२८,
- नाशिक 0२५३- २५९२१४३,
- कोल्हापूर 0२३१- २६९६१0३,
- अमरावती 0७२१- २६६२६0८,
- लातूर 0२३८२- २२८५७0,
- कोकण 0२३५२- २३१२५0.
संबंधित बातमी : राज्यभरात बारावीची परीक्षा, 15 लाख 5 हजार विद्यार्थ्यांची कसोटी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement