एक्स्प्लोर
डबे मागे सोडून पंचवटी एक्स्प्रेसचं इंजिन पुढे धावलं!
शेजारुन जाणाऱ्या ट्रेनमधील प्रवाशांनी ही बाब लोको-पायलटला लक्षात आणून दिली. त्यामुळे शेकडो प्रवाशांचा जीव वाचला.
कल्याण (मुंबई) : इतर डब्यांना मागे सोडून पंचवटी एक्स्प्रेसचं इंजिन पुढे निघून गेल्याची घटना कल्याण स्टेशनजवळ घडली. विशेष म्हणजे, शेजारुन जाणाऱ्या ट्रेनमधील प्रवाशांनी ही बाब लोको-पायलटला लक्षात आणून दिली. त्यामुळे शेकडो प्रवाशांचा जीव वाचला.
21 तारखेल नाशिकवरुन येणाऱ्या राज्यराणी आणि पंचवटी अशा दोन्ही एक्स्प्रेसच्या प्रवशांना त्रास भोगावा लागला. राज्यराणीच्या इंजिनमध्ये कल्याण स्टेशनजवळ बिघाड झालेला. त्यामुळे पंचवटी एक्सप्रेस दुसऱ्या ट्रॅकवरुन पुढे काढण्यात आली. मात्र ती देखिल कल्याण स्टेशनच्या पुढे जाऊन रखडली. कारण एक्स्प्रेसच्या इंजिनने डबे मागेच सोडले.
पंचवटी एक्स्प्रेसमध्ये इंजिनपासून सर्व डब्यांना एअर प्रेशर देऊन ब्रेक मारण्यासाठी वापरला जाणारा पाईप निघाल्यामुळे इंजिन आणि इतर डब्यांमध्ये अंतर वाढले गेले होते. शेजारील ट्रॅक वरुन जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील काही लोकांच्या ही गोष्ट लक्षात येताच, त्यांनी आरडाओरड करुन पंचवटी एक्स्प्रेस थांबवली. 15 मिनिटे ठाकुर्ली स्टेशनजवळ ट्रेन उभी करण्यात आली होती. त्यानंतर लोको पायलटने इंजिन पुन्हा मागे घेतले आणि गाडील जोडून गाडी पुढे रवाना झाली.
ही घटना 21 ऑगस्ट रोजी सकाळी घडली. मात्र रेल्वे प्रशासनाने ही घटना कुणालाही सांगितली नाही. आता या घटनेचे फोटो समोर आल्याने, घटना उघडकीस आली. शिवाय, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
बातम्या
व्यापार-उद्योग
Advertisement