एक्स्प्लोर

शिवसेनेच्या खेळीनंतर, भाजप नेत्यांची ‘वर्षा’वर खलबतं

शिवसेनेच्या या नव्या पवित्र्यामुळे पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा यांचीही बरीच कोंडी झाली आहे. त्यामुळेच सावरा यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली.

मुंबई : पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास यांना उमेदवारी दिल्याचं खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून समजतं आहे. शिवसेनेच्या या खेळीने भाजप मात्र संभ्रमात पडलं आहे. त्यांच्या या राजकारणामुळे भाजपची बरीच गोची झाली आहे. शिवसेनेच्या या नव्या पवित्र्यामुळे पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा यांचीही बरीच कोंडी झाली आहे. त्यामुळेच सावरा यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. यावेळी उमेदवार निश्चितीवरून ‘वर्षा’वर बरीच खलबतं झाल्याचं समजतं आहे. दरम्यान, भाजप आता नेमका काय निर्णय घेणार आणि कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेनेच्या खेळीनंतर, भाजप नेत्यांची ‘वर्षा’वर खलबतं वनगा कुटुंबीयांचा भाजपला रामराम चिंतामण वनगांच्या निधनानंतर भाजपने आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप वनगा कुटुंबीयांनी केला होता. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे वेळ मागितली. मात्र ती देण्यात न आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर चिंतामण वनगांच्या पत्नी आणि मुलाने 3 मे रोजी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेट घेतली आणि शिवसेनेत प्रवेशही केला. भाजपकडून मन वळवण्याचा प्रयत्न वनगा कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांशी सहमत नसल्याचं पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा यांनी सांगितलं. वनगांसोबत अनेक वर्षं काम केलं, आम्ही एकाच गुरुचे शिष्य आहोत. अनेकवेळा पराभवानंतरही आम्ही पक्षाचं काम सोडलं नाही, असंही सावरा म्हणाले होते. वनगांच्या मुलाला निवडणूक लढवण्याची इच्छा होती, मात्र अद्याप त्या ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी त्याला उमेदवारी द्यायची नाही असा निर्णयच झाला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. वनगा कुटुंबाला उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न पालघर पोटनिवडणुकीसाठी चिंतामण वनगांचे पुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी द्या, अशी मागणी पालघरमधील शिवसैनिकांनी केली होती. शिवसेनेकडून श्रीनिवास यांना उमेदवारी दिल्यास, आम्ही सर्वतोपरी मेहनत करुन, त्यांना निवडून आणू, असा विश्वास शिवसैनिकांनी वरिष्ठांना दिला होता. त्यानंतर चिंतामण वनगांच्या कुटुंबीयांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली. 28 मे रोजी पोटनिवडणूक पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 18 उमेदवारांनी अर्ज घेतला आहे. पालघर आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होत असून 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे. संबंधित बातम्या : पालघर पोटनिवडणूक : शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांना उमेदवारी : सूत्र वनगांच्या मुलाच्या मेसेजला पाचव्या मिनिटाला मी रिप्लाय केला : मुख्यमंत्री श्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी सेना-भाजपच्या चाली पक्षाने वाऱ्यावर सोडलं, दिवंगत खासदार वनगांच्या कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश  पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं निधन  पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर  

महत्त्वाच्या बातम्या

FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज जयंत पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला, नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं 
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज जयंत पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला, नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं 

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget