पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पालघरच्या मच्छिमाराचा मृत्यू
Pakistan killed India fisherman : गुजरात राज्यातील वनग बारा येथील जयंतीभाई यांच्या जलपरी बोटीत श्रीधर चामरे हा तरुण मागील तीन महिन्यापासून खलाशी कामगार म्हणून कामावर गेला होता.
Pakistan killed Indian fisherman in firing : पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय मच्छिमाराचा मृत्यू झाला आहे. मृत मच्छिमार हा मूळचा पालघर येथील आहे. गुजरात राज्यातील वनग बारा येथील जयंतीभाई यांच्या जलपरी बोटीत श्रीधर चामरे हा तरुण मागील तीन महिन्यापासून खलाशी कामगार म्हणून कामावर गेला होता. ओखा-पोरबंदर भागातील समुद्रात बोटीवर मासेमारी करीत असताना पाकिस्तान ट्रॉलर्समधून आलेल्या सैनिकांनी गोळीबार केला. या गोळीबारात वडराई येथील मच्छिमार श्रीधर चामरे यांना तीन गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या या गोळीबारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
गुजरात राज्यातील जलपरी या बोटीवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील श्रीधर रमेश चामरे (32) हा तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. बोटीचे कॅप्टन (तांडेल) हे देखील या गोळीबारात जखमी झाले आहेत.
मच्छिमाराला लागल्या तीन गोळ्या
गुजरात राज्यातील वनग बारा येथील जयंतीभाई यांच्या जलपरी बोटीत श्रीधर चामरे हा तरुण मागील तीन महिन्यापासून खलाशी कामगार म्हणून कामावर गेला होता. ओखा-पोरबंदर भागातील समुद्रात बोटीवर मासेमारी करीत असताना पाकिस्तान ट्रॉलर्समधून आलेल्या सैनिकांनी गोळीबार केला. या गोळीबारात वडराई येथील मच्छिमार श्रीधर चामरे यांना तीन गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
श्रीधर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती बोट मालक जयंतीभाई यांनी आपणास दिल्याचे वडराई मच्छिमार सहकारी संस्थेचे चेअरमन माणेंद्र आरेकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बोटीचे कॅप्टन तांडेल यांना गोळी लागल्याने जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मच्छीमार बांधवांमध्ये तणावाचे वातावरण
या घटनेमुळे जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तान सैनिकांच्या अमानवी कृत्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी करण्याची मागणी मच्छिमारांनी केली आहे.
पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेण्याच्या, त्यांच्या बोटी जप्त करण्याच्या घटना वारंवार घडतात. अनेक भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या तुरुंगात कोणतीही चूक नसताना खितपत पडलेले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी स्वयंसेवी संस्थांच्यावतीने प्रयत्न सुरू असतात.