एक्स्प्लोर

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदीत BMC चं 1 कोटी 20 लाखांचं नुकसान, विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा आरोप

मुंबई महापालिकेने कोरोना रुग्णालये आणि कोरोना उपचार केंद्रांसाठी तब्बल 1200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या खरेदीत बीएमसीचं 1 कोटी 20 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेने कोरोना रुग्णालये आणि कोरोना उपचार केंद्रांसाठी 1200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. चिनी बनावटीच्या एका कॉन्सन्ट्रेटरसाठी महापालिका 79 हजार खर्च करणार आहे. त्यापैकी 300 कॉन्सन्ट्रेटर महापालिकेने उत्पादकाकडून न घेता पुरवठादाराकडून घेतले आहे. यामुळे पालिकेचं 1 कोटी 20 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या रुग्णसंख्येचा विचार करुन महापालिकेने प्रति मिनिट दहा लिटर क्षमतेचे 1200 कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या खरेदीसाठी श्रद्धा डिस्ट्रिब्युटर या कंपनीची निवड करण्यात आली आहे. पालिका यासाठी कंत्राटदाराला 10 कोटी 42 लाख रुपये मोजणार आहे. वितरकाने पहिल्या टप्प्यात 300 कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा महापालिकेला केला आहे. जे कॉन्सन्ट्रेटर बाजारात 54 हजार रुपयांना मिळतात तेच कॉन्सन्ट्रेटर पालिकेने 79 हजार रुपयांना विकत घेतले आहे. या व्यवहारात पालिकेचे 1 कोटी 20 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं रवी राजा म्हणाले.

"महापालिकेने उत्पादन करणाऱ्या कंपन्यासोबत करार केला असता तर कमी किमतीत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळाले असते. तसंच पालिकेचे 1 कोटी 20 लाख रुपये वाचले असते," रवी राजा यांनी सांगितलं.

दरम्यान, विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी कमी दरात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळत असल्याचं म्हटलं आहे. "त्यांचे म्हणणे योग्य असले तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान ऑक्सिजनची कमतरता भासली होती. नागरिकांना आणि रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा देता याव्यात यासाठी कॉन्सन्ट्रेटरची खरेदी करण्यात आली," अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.
 
मुंबई महापालिकेने कोरोना रुग्णालयं आणि कोरोना उपचार केंद्रांसाठी तब्बल 1200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. चिनी बनावटीच्या एका कॉन्सन्ट्रेटरसाठी 79 हजार रुपये खर्च केला जाणार असून बाजारभावापेक्षा प्रत्येकी तब्बल 15 ते 20 हजार रुपये अधिक दराने ही खरेदी केली जात आहे. 1200 पैकी 300 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवठादाराने महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report On Devendra Fadnavis Oath : देवेंद्र फडणवीसांनी शपथविधीवेळी आईचं नाव का घेतलं?Majha Gaon Majha Jilha at 630AM 06 December 2024 माझा गाव माझा जिल्हाDevendra Fadnavis Documentry : विधान परिषदेत चमत्कार, कहाणी सत्तासंघर्षाची, गोष्ट देवेंद्रपर्वाची!Special Report On Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीस 3.0 ची सुरुवात, पुन्हा आल्यानंतरची आव्हानं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Embed widget