एक्स्प्लोर
Advertisement
बारावीचा आणखी एक पेपर फुटला!
मुंबई : बारावी परीक्षेच्या पेपरफुटीचं सत्र सुरुच आहे. मुंबईत आज बारावीच्या कॉमर्स शाखेचा बुक कीपिंग अँड अकाऊंटन्सीचा पेपर फुटला आहे. कांदिवलीतील डॉ.टी.आर.नरवणे विद्यालयात हा प्रकार समोर आला आहे.
कॉमर्स शाखेच्या बीकेचा आज पेपर होता. परंतु परीक्षेचं केंद्र असलेल्या डॉ. टी.आर. नरवणे विद्यालयात दोन विद्यार्थी 11.30 ते 11.45 च्या सुुमारास परीक्षेला आले. त्यांच्यावर संशय आल्याने तपासणी करण्यात आली. या विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये बुक कीपिंग अँड अकाऊंटन्सी विषयाची प्रश्नपत्रिका आढळून आली.
याप्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. मोबाईल फोन घेऊन जाण्यास मज्जाव असतानाही हा प्रकार केल्याने त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
व्हॉट्सअॅपवर पेपर कधी व्हायरल झाले?
2 मार्च – मराठी
3 मार्चला – राज्यशास्त्र
4 मार्चला – सेक्रेटरिअल प्रॅक्टिस, भौतिकशास्त्र
6 मार्चला – गणित, संख्याशास्त्र
10 मार्च - बुक कीपिंग अँड अकाऊंटन्सी
संबंधित बातम्या
बारावीचा सलग तिसरा पेपर लीक, गणिताचा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल
बारावीच्या मराठी विषयाच्या पेपरफुटी प्रकरणी चौघे अटकेत
लातुरात बारावीचा पेपर पुन्हा फुटला
बारावीची प्रश्नपत्रिका नवी मुंबईत वेळेपूर्वीच व्हॉट्सअॅपवर
बारावी गणिताच्या पेपर फुटीप्रकरणी मुंबईत दोन विद्यार्थी ताब्यात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
राजकारण
क्राईम
मुंबई
Advertisement