मुंबईत लॉकडाऊनमध्ये बनावट ई पास बनवणाऱ्याचं रॅकेट,एकाला अटक
राज्यांतर्गत प्रवासासाठी तसेच दुसर्या राज्यात प्रवासासाठी सुद्धा या लोकांकडं असे बनावट पास दिले जात होते. यामध्ये सगळ्यात जास्त बनावट पास कोकणात प्रवास करणाऱ्यांसाठी दिले गेले आहेत
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चौथ्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आलं मात्र जी लोक परराज्यात अडकली होती किंवा हातावर पोट असणाऱ्या मजुरांसाठी सरकारने जिल्ह्याअधिकारी आणि पोलीस प्रशासनाला परवानगी देण्यास अधिकार दिले. जी लोकं अडकले आहेत किंवा ज्यांना मेडिकल इमर्जन्सी आहे अशा लोकांना पास देण्यात सुरुच होते. तर दुसरीकडे दोघे जण बनावट पास पाच हजारामध्ये बनवून लोकांना आणि शासनाला फसवत होते. यातील एकाला मुंबई पोलिसांनी अटक केली ज्याच नाव मनोज हुंबे आहे. मनोज हुंबेचा दुसरा जोडीदार फरार असून पोलीस त्याच्या शोधात आहे.
मुंबई पोलीसांना माहिती मिळाली की, लोकांना प्रवासासाठी जे पास देण्यात येत आहे त्याची बनावट कॉपी करून त्याच्या बदल्यात लोकांकडून पैसे उकळले जात आहेत. पोलिसांनी याची चौकशी केली आणि चेंबूर मधून दोघे जण पास बनवत असल्याचं समजलं. पोलिसांनी मनोज हुंबेला अटक केली. आत्तापर्यंत 147 लोकांना यांनी अशा बनावट पास बनवून दिल्याच उघड झाले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे..यांनी हे काम एका आठवड्यापूर्वीच सुरू केलं होते. दहावीसुद्धा पूर्ण केली नाही मात्र संधीचा फायदा कसा घ्यायचा ते यांनी बरोबर हेरलं.
राज्यांतर्गत प्रवासासाठी तसेच दुसर्या राज्यात प्रवासासाठी सुद्धा या लोकांकडं असे बनावट पास दिले जात होते. यामध्ये सगळ्यात जास्त बनावट पास कोकणात प्रवास करणाऱ्यांसाठी दिले गेले आहेत त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, योग्य पद्धतीने अर्ज करूनच पास घ्यावा.
संबंधित बातम्या :
Migrant Workers | मुंबईच्या धारावीत परप्रांतिय मजुरांची आजही गर्दी, रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी रांगा