Dasara Melava : दसरा मेळाव्यानिमित्त एसटी महामंडळासोबत खाजगी बस मालकांना होणार मोठा आर्थिक फायदा, कोणत्या गटाच्या किती बस बुक?
Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून मोठ्या संख्येने एसटी बससोबतच खाजगी बस बुक करण्यात आल्या आहेत. यामुळे एसटी महामंडळासोबत खाजगी बस मालकांना होणार मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
Dasara Melava : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर होणाऱ्या शिवसेनेच्या (Shiv Sena) दसरा मेळाव्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली. यंदा शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) तर शिंदे गटाचा बीकेसीमध्ये (BKC) मेळावा होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून मोठ्या संख्येने एसटी बससोबतच खाजगी बस बुक करण्यात आल्या आहेत. याचा फायदा दोन्ही गटांना किती होणार हे अजून स्पष्ट नसलं तरी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एसटी महामंडळासोबत खाजगी बस मालकांना होणार मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. तर शिंदे गटाचा वांद्रे कुर्ला संकुलात अर्थात बीकेसीमध्ये होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थासाठी दोन्ही गट आमनेसामने आले होते. हा वाद कोर्टातही पोहोचला होता. अखेर हायकोर्टाने ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. आता मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे.
कोणत्या गटाच्या किती बस बुक?
शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून खाजगी 3 हजार बसेस बुक करण्यात येणार असल्याचं कळतं. शिंदे गटाने आतापर्यंत 1800 एसटी बस गाड्या बुक केल्या असल्याची नोंद आहे. शिंदे गटाकडून अजूनही एसटी बस गाड्या बुक करण्यासाठी विचारणा केली जाऊ शकते. तर शिवसेना ठाकरे गटाने साधारणपणे 1400 खाजगी बस गाड्या शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी बुक केल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाने विशेष करुन एमएमआर रिजनमधील खाजगी बस गाड्यांचे बुकिंग केला आहे.
एसटी महामंडळासह खासगी बस मालकांना कोट्यवधीचा फायदा
दसरा मेळाव्याला दोन्ही गटाकडून मोठ्या शक्तिप्रदर्शनाची तयारी केली जात आहे. यात शक्तिप्रदर्शनासाठी राज्यभरातून कार्यकर्ते एकत्र आणण्याचा प्रयत्न दोन्ही गट करता आहेत. याचाच फायदा एसटी महामंडळासोबतच खाजगी बस मालकांना होणार आहे. या बसच्या बुकिंगमुळे कोट्यवधी रुपयांमध्ये होणार आहे.
राज्यातील इतर प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही : एसटी महामंडळ
राज्यभरात साधारणपणे 14 हजारच्या जवळपास बस गाड्या धावतात. त्यातील 1700 ते 1800 च्या जवळपास एसटी बस गाड्या या दसरा मेळाव्यासाठी बुकिंग करण्यात आल्या आहेत. शिवाय दसरा सणाच्या दरम्यान राज्यातील प्रवाशांना कुठलाही त्रास होणार नाही किंवा एसटी बसची कमतरता जाणवणार नाही याची सुद्धा काळजी महामंडळाने पूर्णपणे घेतली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या