एक्स्प्लोर

नॉनव्हेजसाठी वेगळं ताट, IIT मुंबईत हॉस्टेलाईट्सना आदेश

काही मुलांच्या तक्रारीनंतर हा नियम केला असल्याचं ईमेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

मुंबई : आयआयटी मुंबई सारख्या देशातील नामांकित शैक्षणिक संस्थेत मांसाहारी विद्यार्थ्यांना दिलेल्या आदेशामुळे सर्वांचे कान टवकारले आहेत. तुम्हाला हॉस्टेलमध्ये नॉन व्हेजमध्ये खायचं असेल, तर मेसमधील मुख्य ताटांमध्ये जेवू नका, असा ईमेल विद्यार्थ्यांना पाठवण्यात आला आहे. यामुळे नवा वाद सुरु झाला आहे. हॉस्टेल क्रमांक 11 मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 जानेवारीला हॉस्टेलच्या खानावळीकडून एक ईमेल आला आहे. मांसाहारी भोजनासाठी वेगळी ताटं वापरण्याची विनंती यामध्ये विद्यार्थ्यांना करण्यात आली आहे. यामुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही मुलांच्या तक्रारीनंतर हा नियम केला असल्याचं ईमेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे. काय आहे ईमेल? 'मांसाहारी जेवणासाठी वेगळ्या डिश वापराव्यात, अशा सूचना आम्हाला अनेक विद्यार्थ्यांकडून येत आहेत. त्यामुळे सर्व नॉनव्हेजिटेरिअन्सनी कृपया ट्रे टाईप प्लेट्स वापराव्यात, अशी विनंती आहे. त्या खासकरुन मांसाहारी भोजनासाठी आणल्या आहेत. प्लीज नॉनव्हेज खाण्यासाठी मुख्य ताटं वापरु नका. तुम्ही या नियमाचं पालन कराल, अशी आशा आहे.' असा ईमेल पाठवण्यात आला आहे. या आदेशाविरोधात अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आवाज उठवला आहे. आधीच शाकाहारी आणि मांसाहारींसाठी वेगवेगळे काऊंटर्स होते, आता वेगळ्या प्लेट्स का? असा सवाल कोणी विचारला आहे. तर, इतर कोणत्याच वसतिगृहात प्लेट्सबाबत असा आदेश नाही. फक्त शाकाहारी-मांसाहारी आणि जैन फूड वेगवेगळ्या ठिकाणी सर्व्ह होतं, असं काही विद्यार्थी म्हणाले. 'हॉस्टेल 11 मध्ये नुकतंच मांसाहार देण्यास सुरुवात केली. जर आम्हाला चिकन खायचं असेल, तर आधी ऑर्डर द्यावी लागते. मेसमध्ये शिरलात आणि थेट नॉनव्हेज मागितलं, असं करता येत नाही' असं एका विद्यार्थ्याने सांगितलं. आयआयटी मुंबईने मात्र विद्यार्थ्यांचा गैरसमज झाल्याचा दावा केला आहे. आयआयटी मुंबईतील सर्वच वसतिगृहांमध्ये नॉन व्हेज जेवण वेगळ्या काऊंटरवर आणि वेगळ्या डिशमध्ये दिलं जातं. ही जुनी पद्धत आहे. हॉस्टेल 11 मध्ये आताच मांसाहार सुरु झाल्यामुळे या पद्धतीची माहिती व्हावी, म्हणून हा ईमेल पाठवण्यात आला. मात्र आमच्या विनंतीचा गैरसमज करुन घेण्यात आला आहे, असं आयआयटी मुंबईच्या पीआरओंनी सांगितलं. 'काही जणांच्या घरी मांसाहाराची परवानगी नसते. जसं तुम्ही घरी स्वीट डिश वेगळ्या वाटीत खाता आणि भाजी-आमटी वेगळ्या, तशा शाकाहार-मांसाहारासाठी वेगवेगळ्या प्लेट्स राखीव आहेत. प्लेट्स स्वच्छ धुतलेल्या असल्या, तरी काही शाकाहारी विद्यार्थ्यांना मांसाहाराचा वासही सहन होत नाही. त्यामुळे काळजी म्हणून ही विनंती आहे, कोणावरही बळजबरी नाही' असं काही विद्यार्थ्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

अन्न व्यवसायिकांनो सावधान! दिवाळीत कालबाह्य अन्न देऊ नका, अन्यथा... तुकाराम मुंढेंचा इशारा, भेसळयुक्त तेलाविरोधात मोहीम सुरु राहणार असल्याचा उल्लेख 
अन्न व्यवसायिकांनो सावधान! दिवाळीत कालबाह्य अन्न देऊ नका, अन्यथा... तुकाराम मुंढेंचा इशारा, भेसळयुक्त तेलाविरोधात मोहीम सुरु राहणार असल्याचा उल्लेख 
FDA News : एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
Navnath ban and Nilesh Rane: तुझी लायकी किती तू बोलतो किती! नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं: निलेश राणे
तुझी लायकी किती तू बोलतो किती! नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं: निलेश राणे
Mumbai Drone Accident Churchgate station: वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra MLC Election : शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
Supreme Court: 'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Narendra Modi :  अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
Pune Solapur Highway Accident: महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
Gold Silver Rate Crash : सोने दर उच्चांकावरुन 51000 रुपयांनी घसरले, IBJA नं जारी केलेले 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने 1364 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6678 रुपयांनी घसरले, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Gokul Election: महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Embed widget