एक्स्प्लोर

प्रविण दरेकरांनी आणला उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास ठराव  

उपसभापती नीलम गोऱ्हे पक्षपाती पणा करत आहेत. त्यामुळे आम्ही सभापतींना ठराव दिला, अशी माहिती प्रविण दरेकर यांनी दिली. 

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. "उपसभाती यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. विधान परिषदेत सभागृहाचा विश्वास गमावला आहे त्यामुळे हा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे पक्षपाती पणा करत आहेत. त्यामुळे आम्ही सभापतींना ठराव दिला," अशी माहिती प्रविण दरेकर यांनी दिली. 

आज बारा ते साडेबाराच्यादरम्यान विधानपरिषदेत गोंधळ होऊन परिषदेचे कामकाज तहकुब करण्यात आले होते. ज्या लक्षवेधीवरून गोंधळ झाला त्या अकोला महापालिकेतील गैरकारभार, भ्रष्टाचार यांमुळे अकोला महापालिका शासन तत्काळ बरखास्त करण्यात यावे अशी लक्षवेधी गोपिकिशन बजोरिया यांच्याकडून मांडण्यात आली होती. अकोला महापालिकेतील प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे याविषयावर लक्षवेधी घेऊ नये असे प्रविण दरेकरांचे म्हणणे होते. मात्र उपसभापतींनी विधीमंडळाच्या नियमानुसार ही लक्षवेधी मांडली जाऊ शकते, न्यायालयातील निर्णयावर येथील चर्चेचा परिणाम होणार नाही याची काळजी घेऊ असे म्हटले. या विषयावर बोलू न दिल्याने प्रविण दरेकर निलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. 

अकोला मनपा बरखास्त करावी, याबाबतची अकोला महापालिकेची लक्षवेधी  राखून ठेवण्यात यावी. कारण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तरीही लक्षवेधीवर चर्चा झाली. या चर्चेत केवळ शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनाच बोलू दिले. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते असताना नीलम गोरे यांनी मला या विषयावर बोलू दिले नाही, अशी नाराजी प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली. 

"नवी मुंबईत डान्स बार सुरू आहेत. सरकारने ज्या बाबींचा शोध घेऊन कारवाई करण्याचं काम करायचे आहे ते काम एबीपी माझाने केलं आहे. वाशी, बेलापूर भागात 6 ते 7 डान्स बार सुरू असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी अंधेरीमध्ये देखील असाच प्रकार समोर आला होता. सरकारने यावर कारवाई करावी. अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली. 

 "रेल्वे पोलिसांची फटाके घेऊन जाणारी गाडी जळाली, रेल्वे पोलिसांना जबरदस्ती फटाके खरेदी करायला लावले. ज्याने हे केलं त्या कैसर खालिदवर सरकारने काय कारवाई केली? याचं तत्काळ उत्तर द्यावं असा प्रश्न उपस्थित करत अविश्वास ठराव किमान 14 दिवस आधी द्यावा लागतो त्यामुळे पुढच्या अधिवेशनातच या अविश्वास ठरावावर चर्चा होईल अशी माहिती दरेकर यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

Neelam Gorhe : प्रबोधनकार ठाकरेंनी जे हिंदुत्व मांडलं त्याचा अमित शाहांना परिचय व्हावा यासाठी पुस्तक भेट

Mumbai Sakinaka Case : मुंबईतल्या 'निर्भया'चा मृ्त्यू, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे म्हणतात...

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget