एक्स्प्लोर

भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला गडकरींसह महत्वाचे नेते गैरहजर, एक गट नाराज असल्याची चर्चा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रीय कार्याध्यक्षांच्या उपस्थितीत राज्यातील ही शेवटची कार्यसमितीची बैठक आहे. यामुळे सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे एक गट नाराज असल्याची कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू आहे.

मुंबई : आज भाजपच्या मुंबईतील राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबईत आयोजित केली आहे. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यभरातील अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. मात्र या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दांडी मारल्याचे दिसून आले. दुसरा कार्यक्रम असल्याने पूर्वकल्पना देऊन अनुपस्थित राहिल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. तर गडकरी गटाचे राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार पहिल्या सत्रात गैरहजर होते. दुसऱ्या सत्रात राजकीय ठराव मांडण्यासाठी मुनगंटीवार सहभागी होणार आहेत. मंत्री पंकजा मुंडेही आजच्या बैठकीला अनुपस्थित आहेत. वैयक्तिक कारणांसाठी परदेशात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पंकजा यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत असून त्या गैरहजर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रीय कार्याध्यक्षांच्या उपस्थितीत राज्यातील ही शेवटची कार्यसमितीची बैठक आहे.  यामुळे सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे एक गट नाराज असल्याची कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू आहे. चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण गडकरीजी, सुधीरभाऊ, पंकजाताई अनुपस्थित असल्याची बातमी सुरु आहे. सुधीरभाऊंची तब्येत ठीक नसल्याने ते उशिरा आले आहेत. इतरांनी अनुपस्थितीबाबत पूर्व कल्पना दिली होती. आता सुधीरभाऊ राजकीय प्रस्ताव मांडायला दुसऱ्या सत्रात आले आहेत. त्यामुळे ते सुद्धा दाखवावं अशी विनंती आहे, असं पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांची राज्यभर महाजनादेश यात्रा, विधानसभेसाठी असा आहे भाजपचा रोडमॅप दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार कार्यक्रम आखला आहे. विधानसभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अशी महिनाभर मुख्यमंत्र्यांची राज्यभर महाजनादेश यात्रा निघणार आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही महाजनादेश यात्रा काढणार काढणार आहेत. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यभर भाजपची महाजनादेश यात्रा निघणार आहे. आगामी विधानसभेसाठी महाराष्ट्रात भाजप- शिवसेना युती होणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. विधानसभेच्या तयारीसाठी शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रा सुरु केली आहे. यानंतर आता भाजप देखील विधानसभेच्या तयारीसाठी जोमाने मैदानात उरतण्याच्या तयारीत असेल. काय आहे भाजपचा विधानसभा निवडणुकीसाठीचा रोडमॅप? 21 जुलै 2019 - प्रदेश विस्तारित कार्यसमिती 25 जुलै ते 10 आॅगस्ट 2019 - जिल्हासह शक्ती केंद्र प्रमुख बैठक 9 आॅगस्ट 2019 - सदस्यता अभियान ड्राइव्ह 1 जुलै ते 15 आॅगस्ट - नवमतदार नोंदणी अभियान (युवा मोर्चा) 15 जुलै ते 15 आॅगस्ट - विस्तारक योजना (सर्व शक्ती केंद्रांपर्यंत) 10 आॅगस्ट ते 25 आॅगस्ट - विधानसभाश: बूथ कार्यकर्ता संमेलन 1 आॅगस्ट ते 12 आॅगस्ट - शक्ती सन्मान महोत्सव (रक्षाबंधन पर्व) (बुथस्तरावर व मंडल स्तरावर राखी संकलन) 16 आॅगस्ट - रक्षाबंधन कार्यक्रम 1 आॅगस्ट ते 31 आॅगस्ट - महाजनादेश यात्रा 15 आॅगस्ट ते 1 सप्टेंबर - विधानसभा स्तरावर नवमतदार संवाद कार्यक्रम निर्वाचित सदस्य संमेलन 16 आॅगस्ट - स्व. अटलजी स्मृतीदिन (शक्ती केंद्रस्थानी बूथ कार्यकर्ता एकत्रीकरण) तसंच गणेशोत्सवात सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवर आधारित सजावट तसेच विविध प्रकारच्या स्पर्धा - गणेशोत्सव मंडळ तसंच घरगुती गणपतींसाठी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ahilyanagar Leopard Rescue : 80 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला 'असं' केलं रेस्क्यू!ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Embed widget