एक्स्प्लोर
Advertisement
विजय 'मल्ल्याजी' चोर कसे? : नितीन गडकरी
विजय मल्ल्या 40 वर्ष नियमितपणे व्याज भरत होते. त्यानंतर त्यांनी हवाई वाहतूक क्षेत्रात प्रवेश केला आणि ते अडचणीत आले. व्यवसायात चढ-उतार येतच असतात, असं नितीन गडकरी म्हणाले.
मुंबई : एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय 'मल्ल्याजी' चोर कसे होऊ शकतात? असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क मद्यसम्राट विजय मल्ल्याची पाठराखण केली आहे. गडकरींच्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
'विजय मल्ल्या 40 वर्ष नियमितपणे व्याज भरत होते. त्यानंतर त्यांनी हवाई वाहतूक क्षेत्रात प्रवेश केला आणि ते अडचणीत आले. व्यवसायात चढ-उतार येतच असतात. त्यामुळे एखाद वेळेस मल्ल्याजी थकबाकीदार झाले, तर त्यांना चोर किंवा फ्रॉड कसं म्हणणार? ही मानसिकताच गैर आहे' असं गडकरी म्हणाले. मुंबईत 'टाईम्स ग्रुप'तर्फे आयोजित आर्थिक संमेलन कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.
अभिनंदन पायलट आणि ज्योतिरादित्य! विजय मल्ल्याचं ट्वीट
राज्य सरकारच्या ईकाई सिकॉमकडून मल्ल्याला 40 वर्षांपूर्वी कर्ज देण्यात आलं होतं. ते कर्ज त्याने वेळेत परत केलं होतं. एखाद्याला व्यवसायात अडचणी आल्या, तर त्याला पाठिंबा द्यायला हवा, असंही गडकरी म्हणाले. एकीकडे केंद्र सरकारचे मल्ल्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असताना गडकरींनी केलेल्या या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
विजय मल्ल्या भारतीय बँकांचं 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून लंडनला पसार झाला. लंडन कोर्टाकडून विजय मल्ल्यावरील प्रत्यार्पणाच्या कारवाईला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे थकित कर्जप्रकरणी लंडनमध्ये असलेल्या मल्ल्याला कोणताही दिलासा मिळालेला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement