रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत मुंबईचे पोलीस आयुक्तांची हजेरी; नितेश राणेंकडून टीकेची झोड
Nilesh Rane Tweet On Raza Academy : मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा इफ्तार पार्टीत सहभागी झाल्याचा एक फोटो नितेश राणेंनी शेअर करत टीकेची झोड उठवली आहे.
Nilesh Rane Tweet On Raza Academy : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्यावर रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत सहभागी झाल्यानंतर काही सवाल उपस्थित केले आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा इफ्तार पार्टीत सहभागी झाल्याचा एक फोटो नितेश राणेंनी शेअर करत टीकेची झोड उठवली आहे. नितेश राणेंनी म्हटलं आहे की, ज्या ‘रझा अकादमीने’आझाद मैदानात अमर जवान मूर्ती तोडली व महिला पोलिस भगिनींशी गैरवर्तन केले. अशा देशविरोधी कृती करणाऱ्यांच्या इफ्तारमध्ये सामिल होऊन त्यांना अधिकृतरित्या प्रोत्साहित करणे हे महाविकास आघाडीचं धोरण राबविण्याचा अधिकाऱ्यांवरती दबाव आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
— nitesh rane (@NiteshNRane) April 18, 2022
राणे यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं आहे की, मुंबईचे पोलिस आयुक्त रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत उपस्थित होते. रझा अकादमीने सतत देशाविरुद्ध भूमिका घेतली आहे. रझा अकादमीला प्रोत्साहित करणे हे मविआचं धोरण आहे का? असं त्यांनी म्हटलं आहे.
ज्या ‘रझा अकादमीने’आझादमैदानात अमर जवान मुर्ती तोडली व महिला पोलिस भगिनींशी गैरवर्तन केले अशा देशविरोधी कृती करणाऱ्यांच्या इफ्तारमध्ये सामिल होऊन त्यांना अधिकृतरित्या प्रोत्साहित करणे हे महाविकास आघाडीचं धोरण राबविण्याचा अधिकाऱ्यांवरती दबाव आहे का?@OfficeofUT @BJP4Maharashtra pic.twitter.com/8IQDhvmwBJ
— nitesh rane (@NiteshNRane) April 18, 2022
एका बाजूला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आम्हाला विधिमंडळात सांगतात की, रझा अकादमीवर आम्ही बंदी घालण्याचा विचार करतोय. दुसऱ्या बाजूला त्यांचेच अधिकारी रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहतात. महाविकास आघाडी सरकारनं अधिकाऱ्यांना दिलेला हा सरकारी अधिकार तर नाही ना? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
यासंदर्भात एबीपी माझाला पोलिस आयुक्तांच्या जवळच्या लोकांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यात म्हटलं आहे की, ही रजा अकादमीचे इफ्तार पार्टी नव्हती. मोईन मियां या रझा अकादमीशी संबंधित व्यक्तीच्या वडिलांची पुण्यतिथीचा कार्यक्रम होता. त्याला उरुस म्हणतात. हा वार्षिक कार्यक्रम असतो. या फोटोमध्ये रजा अकादमीचे प्रमुख मोहम्मद सय्यद नूरी देखील आहेत.