एक्स्प्लोर
नवीन मंत्रालयाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रस्ताव
मुंबई : मंत्रालयाची जागा अपुरी पडत असल्याने नवीन मंत्रालय बांधण्याचा विचार सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत यावर एकमत झालं असून मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
मंत्रालयाच्या मुख्य इमारतीपाठोपाठ अॅनेक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागाचंही नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी 250 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय सुरक्षा, वाहनांचं पार्किंग यासारख्या कामांसाठी 80 कोटींचा खर्च प्रस्तावित आहे.
भविष्यात ही जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन मंत्रालय बांधण्यावर बांधकाम विभागाच्या बैठकीत एकमत झालं. इतका मोठा निर्णय विभागीय पातळीवर शक्य नसल्याने मुख्यमंत्र्यांकडे सादरीकरण केल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























