एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बँकेची कामं करणारं नवं मशीन लाँच
मुंबई: मुंबईत एक असं मशीन लाँच करण्यात आलं आहे की, जे बँकेचं काम करणार आहे. एटीएमसारखंच हे मशीन असून ते चक्क बँक कर्मचाऱ्याचं काम करु शकतं.
डिमांड डाफ्ट्र बनवण्यापासून ते बँक खातं सुरु करण्यापर्यंत सारी कामं ही डिजिटल मशीन करु शकते. यासाठी फक्त तुम्हाला मशीनवर फिंगर प्रिंट द्यावा लागेल.
भारतात पहिल्यांदाच अशाप्रकारची टेक्नोलॉजी आली आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा बँकेंसोबतच ग्राहकांनाही होणार आहे.
या मशीनमुळे जागेचीही बचत होणार आहे. म्हणजेच बँकेला लागणाऱ्या 2000 स्केअरफूट जागेऐवजी फक्त 500 फूट जागा लागेल. तसेच हे मशीन 24 तास कामही करु शकतं. त्यामुळे दिवस रात्र ही सेवा उपलब्ध होऊ शकते.
यामुळे बँक आणि ग्राहक असा दोघांनाही फायदा होणार आहे. अनेक ग्राहकांचं म्हणणं आहे की, ही सेवा सर्वात आधी सरकारी बँकांमध्ये लागू करणं गरजेचं आहे. ज्यामुळे ग्राहकांना चांगली सेवा मिळू शकते. दरम्यान, भारतात ही सेवा बँका कधी स्वीकारणार हे पाहणं महत्वाचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement