मोठी बातमी! नीट घोटाळ्याचे धागेदोरे मुंबईत, NEET क्लासचा मालक रातोरात फरार, कर्मचाऱ्यांचा संशय बळावला
Mumbai Paper Leak Case: मुंबईतील साकीनाका इथल्या वन एरोसिटी इथे नीट परीक्षेचं मार्गदर्शन करणाऱ्या कंपनीचा मालक अचानक पळून गेल्यानं संशय निर्माण झाला आहे.
NEET Exam Paper Leak Case, Mumbai : मुंबई : नीट पेपरफुटी घोटाळा (NEET Paper Leak Case) प्रकरणामुळे देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नीट घोटाळ्याचे (NEET Scam Case) धागेदोरे काही दिवसांपूर्वी दिल्लीनंतर थेट महाराष्ट्रातील (Maharashtra News) लातूरपर्यंत (Latur) पोहोचले होते. अशातच आता नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट देशाच्या आर्थिक राजधानीपर्यंत येऊन पोहोचल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील साकीनाक्यात नीट परीक्षेचं मार्गदर्शन करणाऱ्या एका कंपनीचा मालक अचनाक रातोरात पसार झाल्यानं संशय बलावला आहे. रातोरात कंपनी बंद करुन मालक पसार झाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये संशय निर्माण झाला आहे. कोणतंही कारण न देता कंपनी बंद केल्यानं कर्मचारी संतप्त झाले आहेत.
मुंबईतील साकीनाका इथल्या वन एरोसिटी इथे नीट परीक्षेचं मार्गदर्शन करणाऱ्या कंपनीचा मालक अचानक पळून गेल्यानं संशय निर्माण झाला आहे. अद्वया विद्या प्रवेश मार्गदर्शक प्रा.लि असं या कंपनीचं नाव आहे. अरविंद देशमुख असं कर्मचाऱ्याचं नाव आहे. मात्र काल अचानकही कंपनी बंद करुन मालक फरार झाला आहे. एकीकडे नीट परीक्षेबाबत मोठा घोटाळा समोर येत असताना या कंपनीच्या मालक फरार झाल्याने संशय निर्माण होत आहे. इथल्या कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगार मिळालेला नाही. त्यात कोणतंही कारण न देता ही कंपनी बंद केल्यानं कर्मचारी संताप व्यक्त करत आहेत, तसेच चौकशीची मागणीही करत आहेत.
साकीनाका येथील वन एरोसिटी येथे नीट परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या कंपनी चा मालक अचानक पळून गेल्याने मोठे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.अद्वया विद्या प्रवेश मार्गदर्शक प्रा.ली असे या कंपनी चे नाव आहे. तिच्या मालकाचे नाव अरविंद देशमुख असल्याचे त्याने कर्मचाऱ्यांना सांगितले होते.मात्र काल अचानक ही कंपनी बंद करून मालक फरार झाल्याने मोठे संशयाच वातावरण निर्माण झालं आहे. एकीकडे नीट परीक्षेबाबत मोठा घोटाळा समोर येत असताना या कंपनी च्या मालकाने फरार झाल्याने यात संशय निर्माण होत आहे.इथल्या कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगार मिळालेला नाही.त्यात कोणतेही कारण न देता ही कंपनी बंद केल्याने कर्मचारी संताप व्यक्त करीत आहेत, तसेच चौकशी ची मागणी करीत आहेत.
आमदार दिलीप लांडे यांच्याकडून 'त्या' कंपनीची पाहाणी
नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कंपनी असलेल्या अद्वैया विद्या प्रवेश मार्गदर्शक या कंपनीनं रात्री काही तासांत कंपनी बंद करून पळ काढल्यानं मोठ्या संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी देखील या कंपनीची पाहणी केली. इथल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.तसेच या सबंधित कसुन चौकशी करण्याची मागणी दिलीप लांडे यांनी केली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांना माहिती देणार असल्याचे आमदार लांडे यांनी सांगितलं.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI