एक्स्प्लोर
Advertisement
शरद पवार हे महाराष्ट्राचे जाणता राजाच; उदयनराजेंना आव्हाडांचे प्रत्युत्तर
छत्रपती शिवरायांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करणारं एका पुस्तकावरुन सध्या वादंग उठला आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावर शरद पवारांचे नाव न घेता टीका करण्यात आली आहे.
मुंबई : भाजप नेते व माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी 'जाणता राजा' या उपाधीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली. त्यांच्या या टीकेला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे जाणता राजाच असल्याचं आव्हाडांनी म्हटलं आहे. आव्हाड यांनी व्हिडीओच्या माध्यमातून उदयनराजे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न आदी प्रश्नांची उत्तरे शरद पवार यांच्याकडे असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. शरद पवार यांची करंगळी पकडून अनेकजण राजकारणात आले. अनेकजण त्यांच्यावर टीका करुन राजकारणात प्रस्थापित झाले असल्याचा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. तसंच कोण काय बोलतंय याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असंही आव्हाड म्हणाले.
उदयनराजे भोसलेंची पवारांवर टीका -
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वादग्रस्त पुस्तकाबाबत भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कुणीही गाठू शकणार नाही, मात्र अलिकडे 'जाणता राजा' ही उपमाही दिली जाते. मी याचाही निषेध करतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज हेच आहेत, अशी अप्रत्यक्ष टीका उदयनराजे यांनी शरद पवारांवर केली.
छत्रपती शिवरायांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करणारं एक पुस्तक दिल्ली भाजपच्या कार्यालयात नुकतेच प्रकाशित करण्यात आलं होतं. त्यावरुन वादंग उठला होता. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी शिवरायांचे वंशज असणाऱ्या कोल्हापूर आणि साताऱ्याच्या गादीच्या वारसदारांनी भूमिका स्पष्ट जाहीर करण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना उदयनराजेंनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर ताशेरे ओढले आहेत.
'छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदी यांची तुलना करणारे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर आपल्याला वाईट वाटले. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कुणीही गाठू शकणार नाही, मात्र अलिकडे 'जाणता राजा' ही उपमाही दिली जाते. मी याचाही निषेध करतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज हेच आहेत, असं म्हणत उदयनराजे यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टोला लगावला होता.
संबंधित बातम्या -
UNCUT | छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाबरोबरही होऊ शकत नाही, उदयनराजेंची पत्रकार परिषद | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement