एक्स्प्लोर
Advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे संविधान धोक्यात: शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे संविधान धोक्यात आलं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे संविधान धोक्यात आलं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. ते मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ या कार्यक्रमात बोलत होते.
गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांड झालं त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. धक्कादायक म्हणजे दोषींवर कारवाई करण्याऐवजी निर्दोष लोकांची हत्या झाल्याचं चित्र होतं, असंही पवार म्हणाले.
दरम्यान गोळवरकर गुरुजींनी आंबेडकरांच्या संविधानाबाबत एका पुस्तकाच्या माध्यमातून टीका केली होती. त्यांच्या विचारांवर चालणारा भाजप पक्ष आह. त्यामुळे संविधानाबाबत भाजपकडून कितीही चांगली वक्तव्यं होत असली तरी ती धादांत खोटी असल्याची टीका पवारांनी केली. यावेळी इंदिरा गांधींचा दाखला देत मोदींनाही नागरिक धडा शिकवतील असा इशारा पवारांनी दिला.
इंदिरा गांधी यांनी गरिबांसाठी खूप कामं केली, पण जेव्हा त्यांनी संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा याच नागरिकांनी इंदिरा गांधीसारख्या मोठ्या नेत्यांना धडा शिकवला. त्यामुळे मोदींनाही जनता धडा शिकवेल, असं पवार म्हणाले.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement