एक्स्प्लोर
मेगाभरतीत भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची होणार घरवापसी?
गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, या नेत्यांची लवकरच घरवापसी होण्याची शक्यता आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांची घरवापसी होण्याची शक्यता आहे. माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी याचे संकेत दिले आहे. विजयसिंह मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. मात्र, लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील भाजपच्या मंचावर भाजप उमेदवारांचे समर्थन करताना दिसले होते.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा बुधवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ व दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात मोहितेपाटलांना पाहिल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होते. कार्यक्रम संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विजयसिंह मोहिते पाटलांनी मी राष्ट्रवादीतच असल्याचं स्पष्ट केलं.
विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या या विधानामुळे भाजप यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलाला उमेदवारी न मिळाल्याने रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटलांनी भाजपमध्ये थेट प्रवेश घेतला नसला तरी भाजपच्या मंचावर ते नेहमी अग्रणी राहिल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांनी राष्ट्रवादीत असल्याचे सांगत भाजपला दे धक्का दिल्याचे पाहायला मिळतंय.
विजयसिंह मोहिते पाटील हे राज्यातील दिग्गज नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक निर्माण, पर्यटन आणि ग्रामीण विकास मंत्रीपद सांभाळले आहे. तर, 2014 मध्ये ते माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा सदस्य म्हणून निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांची राष्ट्रवादीतील घरवापसी भाजपला मोठा झटका मानला जातोय.
गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजपवासी झाले होते. यातील अनेक पक्षबदलू लोकांना भाजपने उमेदवारी दिली. यात बऱ्याच जणांचा पराभव झाला. तर, शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यामुळे निवडून आलेल्या लोकांची उरली सुरली आशा देखील धुळीस मिळाली. त्यामुळेच विजयसिंह मोहिते-पाटील यांची घरवापसी ही सुरुवात मानली जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अनेक काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी ते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांसोबत वारंवार संपर्क करत आहेत.
हेही वाचा - विजयसिंह मोहिते पाटलांचा सत्कार करणे हे माझं भाग्य : नरेंद्र मोदी
Vijaysigh Mohite Patil | मी राष्ट्रवादीतच, शरद पवारांना तीनदा भेटलो : विजयसिंह मोहिते पाटील| ABP MAJHA
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रीडा
बीड
क्रीडा
Advertisement