एक्स्प्लोर

NCP Sharad Pawar vs Ajit Pawar : अजित पवार गटांकडून शरद पवार गटातील 11 पैकी 10 आमदारांविरोधात विधिमंडळात याचिका; कोणत्या आमदाराला वगळले, पाहा यादी

NCP Ajit Pawar VS Sharad Pawar : शरद पवार गटातील 11 पैकी 10 आमदारांविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून एका आमदाराचे नाव अजित पवार गटाकडून वगळण्यात आले आहे.

मुंबई शिवसेना पक्षातील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटामधील संघर्ष आता तीव्र होण्याची चिन्हं आहेत.  शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवार गटाच्या  ( Ajit Pawar ) विरोधात कारवाईला वेग आल्यानंतर आता अजित पवार गट देखील शरद पवार गटाविरोधात आक्रमक झाला आहे. याचिकेत समाविष्ट केलेल्या आमदारांची नावे 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहेत.

अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या गटातील आमदारांविरोधात विधिमंडळात याचिका दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटातील 11 पैकी 10 आमदारांविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून एका आमदाराचे नाव वगळण्यात आले आहे. 

शरद पवार गटातील 10 आमदारांच्या विरोधात याचिका (Sharad Pawar NCP Faction)

अजित पवार गटाच्या वतीने गुरुवारी विधिमंडळात शरद पवार गटातील दहा विधानसभेच्या आमदारांविरोधात आणि विधानपरिषदेच्या तीन आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करणारी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली. पक्ष विरोधी कृती केल्यामुळे सदर आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे.

अजित पवार गटाकडून विधिमंडळात दाखल केलेल्या याचिकेत 11 पैकी 10 शरद पवार गटातील आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. 

विधानसभेतील या आमदारांविरोधात याचिका

1) जयंत पाटील

2) जितेंद्र आव्हाड

3) रोहित पवार

4) सुमन पाटील

5) सुनील भुसारा

6) प्राजक्त तनपुरे

7) बाळासाहेब पाटील

8) अनिल देशमुख

9) राजेश टोपे 

10) संदीप क्षिरसागर 

विधान परिषदेतील या आमदारांविरोधात याचिका

1) शशिकांत शिंदे

2) अरुणकाका लाड

3) एकनाथ खडसे

कोणत्या आमदाराचे नाव वगळले?

अजित पवार गटाने विधिमंडळाकडे याचिका दाखल करताना शरद पवार गटातील एका आमदाराचे नाव वगळले आहे. याचिकेत शिरूरचे आमदार अशोक पवार यांचं नाव नाही. 

अजित पवारांना पाठिंबा देणारा खासदार कोण?

राष्ट्रवादीच्या गोटातील राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग आला असून शरद पवार  ( Sharad Pawar ) गटातील आणखी एका खासदाराचे आणि एका आमदाराचे समर्थन अजित पवारांना ( Ajit Pawar ) असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोघांनीही त्यांचं प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे दिल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांना समर्थन देणारा तो खासदार कोण, अशी चर्चा रंगली आहे. 

इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget