एक्स्प्लोर

महिलेला फासावर लटकावून मारले, मंगळसूत्र चोरल्याच्या आरोपावरून विकृती, पनवेलमधील दुन्द्रे गावातील घटना

महिला अत्याचारांच्या घटनांनी महाराष्ट्र पुरता हादरुन गेला आहे. हिंगणघाट, औरंगाबादच्या घटना ताज्या असतानाच आता नवी मुंबईतून संतापजनक घटना समोर आली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईत महिलेस फासावर लटकावून मारल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पनवेलमधील दुन्द्रे गावात ही संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पाच आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. माहितीनुसार शेजारील रहिवाशांबरोबर भांडणातून ही हत्या झाली असल्याचे समोर आले आहे. या वादातून महिलेला जाळून मारण्याचा प्रयत्न केला गेला. नंतर आरोपींनी तिला गळफास देवून हत्या केली.  55 वर्षीय शारदा गोविंद माळी असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. पनवेल मधील दुन्द्रे गावात ही खळबळजनक घटना घडली. मंगळसूत्र चोरले असल्याचा आरोप मयत महिलेवर आरोपींनी केला होता. घरात कोणी नसल्याचे पाहून महिलेला गळफासावर लटकवले, असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे. या प्रकरणी पोलिसांनी लक्ष घालून आरोपींना तात्काळ अटक करावे आणि त्यांना कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.
माहितीनुसार क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात शेजारी राहणाऱ्या आरोपींनी त्यांची हत्या केली आहे. शारदा माळी यांना पहिल्यांदा जाळण्याचा प्रयत्न झाला. यानंतर त्यांना फासावर लटकवून त्यांची हत्या करण्यात आली. पहिल्यांदा ही आत्महत्या असल्याचे भासविण्यात आले होते. मात्र शारदा यांची अवस्था पाहता त्यांना पहिल्यांदा जाळण्याचा प्रयत्न झाला आणि नंतर फासावून लटकवून हत्या केल्याचा आरोप मयताची मुलगी आणि पतीने केला आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार झालेल्या पाच आरोपींचा शोध सुरू आहे. यामध्ये अलका गोपाळ पाटील (45), वनाबाई अर्जुन दवणे (60), गोपाळ विट्ठल पाटील (48), हनुमान भगवान पाटील (42), अशी आरोपींची नावे असून एक आरोपी अल्पवयीन तरुणी आहे.
मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणावरून शेजारी राहणाऱ्या आरोपींची आणि मयत महिलेच्या कुटुंबाचे भांडण झाले होते. याचा राग मनात धरत आरोपी गोपाळ पाटील , हनुमंत पाटील यांनी आपल्या घरातील तीन महिलांना घेवून शारदा माळी यांच्या घरात प्रवेश केला. घरात त्या एकट्या पाहून त्यांची हत्या करून आरोपी फरार झाले. दरम्यान राज्यात एका आठवड्यात महिलांची निघृणपणे हत्या करण्याच्या चार घटना घडल्या असून हा महाराष्ट्राला कलंक असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा पोलिसांवर वचक राहिला नसल्याचाही आरोप देखील भाजपा प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Embed widget