एक्स्प्लोर

Mumbai : महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?

Mumbai MMR : मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्ससाठी महारेराने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, याचा चांगला फायदा विकासकांना होणार आहे.

मुंबई : महारेराशी संबंधित विनियामक बाबींबाबत मार्गदर्शन आणि मदत व्हावी, यासाठी मुंबई महाप्रदेशाबाहेरील विकासकांसाठी (Builders, Developers) स्वयंविनियमक संस्था, म्हणजेच SRO (Self Regulatory Organisation) स्थापन करण्याची अट किमान 500 प्रकल्पांवरून किमान 200 करण्याचा निर्णय महारेराने नुकताच घेतला आहे. मुंबई महाप्रदेशाबाहेर मोठ्या प्रमाणात विकसित होत असलेल्या गृहनिर्माण क्षेत्राची बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन महारेराने हा नियम बदल केला आहे.

बिल्डर्सना होणार मोठा फायदा

बिल्डर्सच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी, गरजेनुसार त्यातील दुरुस्ती, नूतनीकरण, त्रैमासिक प्रगती अहवाल, प्रकल्प पूर्तता अहवाल अशा विनियामक बाबींशी संबंधित अनेक बाबींबाबत अधिकृत आणि विश्वासार्ह मार्गदर्शन आणि मदत आपल्या सदस्य विकासकांना याद्वारे आता करता येणार आहे.

विकासकांच्या समुहाला मिळणार मान्यता

विकासकांच्या कायदेशीर मान्यता असलेल्या समुहाला किंवा संस्थेला किंवा महासंघाला काही अटींसापेक्ष महारेराशी संबंधित विविध कामांसाठी स्वयंविनियामक संस्था म्हणून मान्यता देण्याचा निर्णय महारेराने देशात पहिल्यांदा ऑक्टोबर 2019 मध्ये घेतला.

SRO चे प्रतिनिधी ठरणार दुवा

महारेरा स्थापन झाल्यापासून सर्व विकासकांना त्यांचे प्रकल्प नोंदणी करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा विकासक प्रकल्पाबाबत योग्य ती कागदपत्रे  आणि अत्यावश्यक माहिती व्यवस्थितपणे देत नाहीत. यामुळे नवीन प्रकल्प नोंदणी आणि दुरुस्ती, नुतनीकरण आणि तत्सम अर्जांची प्रक्रिया लांबत जाते. विकासकांच्या नवीन प्रकल्पांची  नोंदणी आणि तत्सम प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्वयंविनियामक संस्थांचे या एकूण प्रकियेबाबत सर्व माहिती असलेले प्रतिनिधी  त्यांना मदत करतात.  महारेराने  मध्यस्थ आणि दलालांना कार्यालयात प्रवेश बंद केलेला असून फक्त स्वयं विनियामक संस्थांचे ( Self Regulatory Organisation) प्रतिनिधी  हे विकासकांचेही  प्रतिनिधी म्हणून ग्राह्य धरले आहेत. 

बिल्डर्सच्या 7 संस्था महारेराकडे नोंदणीकृत

महारेराकडे सध्या विकासकांच्या एकूण 7 स्वयं विनियामक संस्था (Self Regulatory Organisation-SRO) नोंदणीकृत आहेत. यात 
नरेडको पश्चिम फाऊंडेशन  (NAREDCO West Foundation), क्रेडाई एमसीएचआय (CREDAI-MCHI), क्रेडाई महाराष्ट्र (CREDAI MAHARASHTRA ), बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (BUILDERS ASSOCIATION OF INDIA ),  मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन (MARATHI  BANDHKAM VYAVSAYIK ASSOCIATION) , बृहन्मुंबई डेव्हलपर  असोसिएशन (BRIHANMUMBAI DEVELOPER ASSOCIATION.) आणि क्रेडाई- पुणे मेट्रो (  CREDAI- Pune Metro )
यांचा समावेश आहे.

SRO मुळे होणार बिल्डर्सना मदत

स्वयंविनियामक संस्था स्थापन करण्याचा मूळ उद्देश विकासकांना मदत करणे हा आहे. महारेराकडे प्रकल्प नोंदणी करताना संबंधित विकासक सध्या या 7 पैकी एका संस्थेचे नोंदणीकृत सदस्य असणे आवश्यक आहे.  महारेरा विकासकांच्या अर्जांची छाननी करुन ते ज्या संस्थेचे  सदस्य असतात त्याच संस्थेच्या  प्रतिनिधींना  याबाबतची माहिती आणि त्यासंबंधित निघालेल्या शेऱ्यांची यादी पुरवतात. हे संस्था प्रतिनिधी त्यांच्या नोंदणीकृत सदस्य असलेल्या विकासकांच्या अर्जांबाबत पाठपुरावा करुन महारेरा आणि विकासकांमधील दुवा बनलेले आहेत. महारेराच्या अटी बदलामुळे उर्वरित महाराष्ट्रातील काही नवीन संस्थांचा यात समावेश होऊन उर्वरित महाराष्ट्रातील प्रकल्पांना त्याचा चांगला उपयोग होणार आहे.

हेही वाचा:

Santosh Deshmukh Case : मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
Rajan Salvi : उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
Santosh Deshmukh Case: बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता एसआयटीचे प्रमुख तपासाचा चार्ज घेणार
बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता वाल्मिक कराडच्या नार्को टेस्टची मागणी
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये  5 जणांवर गुन्हा दाखल
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar on Beed Police Station : बीड पोलीस स्टेशनमध्ये अचानक पाच नवे पलंग का मागवले?Maharashtra Cabinet Meeting : शंभर दिवसांचा रोड मॅप, खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठकTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 02 जानेवारी 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
Rajan Salvi : उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
Santosh Deshmukh Case: बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता एसआयटीचे प्रमुख तपासाचा चार्ज घेणार
बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता वाल्मिक कराडच्या नार्को टेस्टची मागणी
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये  5 जणांवर गुन्हा दाखल
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Case : मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
Alpha Gereration : मिलेनियल्स, जेन Z नंतर आता 'ही' जनरेशन; पिढ्यांची नावं कशी ठरवली जातात?
मिलेनियल्स, जेन Z नंतर आता 'ही' जनरेशन; पिढ्यांची नावं कशी ठरवली जातात?
Sanjay Raut : हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
Embed widget