एक्स्प्लोर
आयएनएस बेतवा युद्धनौका मुंबईतील समुद्रात अपघातग्रस्त
मुंबई : भारतीय नौदलातील आयएनएस बेतवा ही युद्धनौका मुंबईजवळच्या समुद्रात अपघातग्रस्त झाली आहे. नेव्हल डॉकयार्डमधून समुद्रात ही युद्धनौका उतरवली जात असताना तिला अपघात झाला.
तांत्रिक कारणांमुळे 'आयएनएस बेतवा'ला अपघात झाल्याची माहिती नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी के शर्मा यांनी दिली आहे. दुपारी 1 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातामुळे 'आयएनएस बेतवा'चं किती नुकसान झालं आहे, हे तपासण्याचे आणि दुरुस्तीचे काम सुरु आहे.
ब्रह्मपुत्रा हे क्षेपणास्त्र असलेल्या आयएनएस बेतवाचं वजन 3 हजार 800 टन आहे. ही युद्धनौका 2004 मध्ये नौदलात सहभागी झाली होती. बेतवा नदीवरुन या युद्धनौकेला नाव देण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement