एक्स्प्लोर

Ganeshotsav : गणपती बाप्पा मोरया! यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईतील गणपती मंडळांना भेट द्याच

Ganeshotsav Celebration : सुखकर्ता, दु:खहर्ता, विघ्नहर्ता, गणपती बाप्पा घरोघरी यायला फक्त एक आठवडा बाकी आहे. यंदाचा गणेशोत्सव खास आहे. कारण दोन वर्षानंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय गणपती उत्सव धूमधडाक्यात आणि जल्लोषात साजरा होणार आहे.

Ganeshotsav Celebration : सुखकर्ता, दु:खहर्ता, विघ्नहर्ता, गणपती बाप्पा घरोघरी यायला फक्त एक आठवडा बाकी आहे. यंदाचा गणेशोत्सव खास आहे. कारण दोन वर्षानंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय गणपती उत्सव (Ganpati Festival 2022) धूमधडाक्यात आणि जल्लोषात साजरा होणार आहे. तसंच यावेळी गणेश मूर्तींच्या (Ganesh Idol) उंचीवरही कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे मुंबईत पुन्हा गणपतीचा उत्सव थाटात होणार आहे. उंच गणेशमूर्ती आणि भव्यदिव्य सजावट हे मुंबईतील गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असतं. वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील गणेश आगमन सोहळा सुरू झाला आहे.  पाहूयात मुंबईतील प्रमुख गणपती मंडळाचं आकर्षण असते.  

मुंबईचा राजा -
मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या लालबागमधील गणेशगल्लीच्या गणपतीचं यंदाची मूर्ती आणि सजावट आकर्षक असणार आहे. मुंबईतील लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा 95 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने मुंबईचा राजा अशी ओळख असलेल्या मित्र मंडळाने यावर्षी काशी विश्वनाथ मंदिराचा भव्य देखावा साकार केला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना मुंबईचा राजा  विश्वकर्मा रुपात पाहायला मिळणार असून भव्य अशी 22 फुटांची मूर्ती मुंबईच्या राजाची असणार आहे. 

लालबागचा राजा - 
'नवसाला पावणारा बाप्पा' अशी ख्याती असलेल्या मुंबईतील 'लालबागचा राजा' (Lalbaugcha Raja)  च्या दर्शनाला देशभरातून भक्तांची रांग लागते. लालबागच्या राजा ज्या ठिकाणी विराजमान असतो, त्याच ठिकाणी बाप्पाची मुर्ती साकारली जाते. सर्वात आधी पाद्यपूजन सोहळा पार पडतो. आणि या सोहळ्यानंतर मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरूवात होते. त्यामुळे लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. या वर्षी मंडळसाठी विशेष आकर्षण असणार आहे.  कारण, लालबागचा राजा गणपती उत्सवाचे हे 89 वे वर्षे आहे. जर तुम्हाला घरबसल्या लालबागच्या राजाचं दर्शन हवं असेल तर मंडळाच्या अधिकृत फेसबुक पेज, ट्विटर, यु ट्यूब वर ऑनलाइन मिळेल. 

चिंचपोकळीचा चिंतामणी -
चिंचपोकळीचा चिंतामणी म्हटलं की त्याचा आगमन सोहळा हा सर्वात प्रसिद्ध आहे. सर्वात दणकेबाज आगमन म्हणजे चिंताणीचंच होत असल्याचं आजवर दिसून आलं आहे. त्यात या मंडळाचे टी-शर्ट अगदी सर्व मुंबई आणि आसपासच्या परिसरातच नाही तर महाराष्ट्रातील बऱ्याच गावात देखील पोहोचले आहेत. गणपतीच्या आगमनाच्या दोन-तीन महिने आधीपासूनच या मंडळाच्या स्पेशल टीशर्ट पॅटर्नचा मेसेज व्हायरल होतो. त्यानुसार विविध गणेशभक्त मंडळाजवळ येऊन टी-शर्टचे पैसे भरुन टी-शर्ट बुक करतात आणि आगमन सोहळ्यादिवशी घालून लाडक्या बाप्पाचं आगमन करतात.
 
जीएसबी  - 
माटुंगा येथील जीएसबी सेवा (गौड सारस्वत ब्राह्मण) गणेश मंडळाला मुंबईतील सर्वात धनाढ्य गणपती म्हणून ओळखलं जातं.  यंदा या गणेश मंडळाने यंदाही आपली परंपरा कायम राखली आहे.  श्री गणेशमूर्ती मंडप इतर साहित्याचा त्यांनी तब्बल 300 कोटींचा विमा उतरवला आहे. जीएसबी मंडळाच्या गणेश मूर्तीमध्ये 68 किलो सोने आणि 327 किलो चांदी आहे. तसेच मंडप तयार करण्यासाठी 315 किलो चांदीचा वापर करण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे.  

तेजुकाय मेन्शन गणपती -
अनेक गणेशभक्त लालबागच्या राजाचे दर्शन घेल्यानंतर मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळ तेजुकाय मेंशनच्या गणरायाचे दर्शन घ्यायला नक्कीच जातात. हे मंडळ देखील गणेश गल्ली आणि चिंतामणी इतकेच प्रसिद्ध आहे. तेजुकाय गणपती बाप्पाची मुर्ती अतिशय सुंदर आणि रेखीव असते. यामुळेच तेजुकाय मंडळाच्या वतीने साकारल्या जाणाऱ्या देखाव्यासोबतच मुर्तीचं देखील सर्वांनाच आकर्षण असते. 

खेतवाडीचा महाराजा - 
परशुराम रुपी मुंबईच्या महाराजाच्या गणेश मूर्तीची उंची तब्बल 38 फुटांची आहे. दोन वर्षांमध्ये गणेश मूर्तींच्या उंचीचे निर्बंध हटवल्यानंतर ही आतापर्यंतची सर्वात उंच गणेशमूर्ती यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. खेतवाडी गणेशोत्सव मंडळ हे उंच गणेश मूर्तीच्या दर्शनासाठी हे प्रसिद्ध आहे. त्यामध्ये खेतवाडी अकरावी गल्ली, मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी ही उंच मूर्ती घडवली आहे. या मूर्तीच्या समोर गुरुकुलाचा देखावा साकारण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांना उंचच उंच गणेश मूर्तींचे दर्शन घेता येणार आहेच शिवाय वेगवेगळे आकर्षक देखावे सुद्धा पाहायला मिळणार आहेत.

परळचा राजा
भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच वर्षी म्हणजे 1947 मध्ये या मंडळाची स्थापना झाली. नरे पार्कचा राजा किंवा परळचा राजा अशा नावाने सर्वत्र परिचीत आहे. परळच्या राज्याला भेट देण्यासाठी असंख्य भाविक दर वर्षी येत असतात. यंदा या मंडळाला 75 वर्ष पूर्ण झाले आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Embed widget