एक्स्प्लोर
Advertisement
गणेशोत्सव काळात धोकादायक पुलांवर नाच गाण्याला आवर घाला, महापालिकेच्या गणेश मंडळांना सूचना
सर्वात जास्त काळजी आणि शिस्त गिरणगाव आणि गिरगावातील मंडळांना घ्यावी लागणार आहे. कारण इथेच मोठे आणि गर्दी असलेले मंडळ आहेत. तसेच धोकादायक पूल देखील आहेत.
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला आता काही दिवस बाकी असतानाच अशातच मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना प्रशासनानं गंभीर सूचना दिल्या आहेत. यामध्ये त्यात विसर्जनाच्या दिवशी कमकुवत, जर्जर झालेल्या पुलांवर नाचू नका अशी सूचना महापालिका प्रशासनाने मुंबईतील गणेश मंडळांना केली आहे.
नाच-गाण्यामुळे दाब येऊन पुलाचे आणखी नुकसान होऊ शकते. तसेच गणेश भक्तांनी पुलावर जास्तवेळ रेंगाळू नये. त्यांनी शांतपणे पूल पार करावा अशा सूचनाही महापालिका प्रशासनाने सर्वच गणेश मंडळांना दिल्या आहेत. मुंबईत मागच्या काही काळात पूल कोसळून जिवीतहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमिवर सूचना दिल्या आहेत. या प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत मूर्तिकार आणि गणपती मंडळ यांनी देखील केले आहे.
यात सर्वात जास्त काळजी आणि शिस्त गिरणगाव आणि गिरगावातील मंडळांना घ्यावी लागणार आहे. कारण इथेच मोठे आणि गर्दी असलेले मंडळ आहेत. तसेच धोकादायक पूल देखील आहेत.
VIDEO | मुंबई पालिका, रेल्वेचे मिळून 34 धोकादायक पूल बंद | एबीपी माझा
मुंबईतील धोकादायक पूल
- वाकोला पाइप लाइन सर्व्हिस रोड पूल
- जुहू तारा रोड पूल
- धोबी घाट मजास नाला पूल
- मेघवाडी नाला पूल शामनगर अंधेरी
- वांद्रे-धारावी मिठी नदी पूल
- रतननगर-दौलतनगर पूल कांदिवली
- ओशिवरा नाला एसव्ही रोड गोरेगाव पूल
- पिरामल नाला पूल लिंकरोड गोरेगाव
- चंदावडकर नाला पूल मालाड
- गांधीनगर कुरार व्हिलेज मालाड पूल
- प्रेमसागर नाला एसव्ही रोड पूल मालाड
- फॅक्ट्री लेन बोरिवली पूल
- कन्नमवारनगर घाटकोपर
- लक्ष्मीबाग नाला पूल घाटकोपर
- नीलकंठ नाला घाटकोपर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement