एक्स्प्लोर

मुंबईकरांनो सावधान कोरोना सोबतच डेंग्यू, मलेरियाचंही संकट!

मुंबईत कोरोना विषाणू संसर्गासोबत आता डेंग्यू, मलेरियाचंही संकट निर्माण झालं आहे. महापालिकेच्या कीटकनाशक खात्याला केवळ नऊ दिवसांच्या तपासणी मोहिमेदरम्यान शहरात एक हजार 146 ठिकाणी डेंग्यू; तर 333 ठिकाणी मलेरिया वाहक डासांच्या अळ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई : कोरोनाचं वाढतं संकट कमी होतं की काय म्हणून आता मुंबईकरांसमोर आणखी एक संकट आ वासून उभं राहिलं आहे. केवळ नऊ दिवसांच्या तपासणी मोहिमेदरम्यान शहरात एक हजार 146 ठिकाणी डेंग्यू; तर 333 ठिकाणी मलेरिया वाहक डासांच्या अळ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या कीटकनाशक खात्यानं मुंबईच्या कानाकोपऱ्यात सर्वेक्षण सुरु केलं आहे. आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात कुठेही उघड्यावर साचलेलं पाणी असणार नाही. याची आत्यंतिक काळजी घेण्याचं आवाहन महापालिकेच्या कीटक नाशक खात्याने मुंबईकरांना केलं आहे.

डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्या दृष्टीने घरांची व घरांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे नियमितपणे करण्यात येत असते. तर पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यातही तपासणी मोहीम स्वरूपात केली जाते. पावसाळापूर्व करण्यात येणारी मोहीम स्वरूपातील तपासणी 13 मे 2020 पासून सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान दिनांक 13 मे ते 21 मे 202 या केवळ नऊ दिवसांच्या कालावधीत तब्बल 1 हजार 146 ठिकाणी 'एडिस एजिप्ती' (Aedes aegypti) या डेंग्यू प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या अळ्या; तर 333 ठिकाणी मलेरिया वाहक 'ऍनॉफिलीस स्टिफेन्सी' (Anopheles stephensi) डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.

डासांची उत्पत्तीस्थाने तात्काळ नष्ट तपासणी मोहिमेदरम्यान आढळून आलेली डासांची उत्पत्तीस्थाने तात्काळ नष्ट करण्यात आली आहेत, अशी माहिती महापालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक खात्यातील 1 हजार 500 कामगार-कर्मचारी-अधिकारी हे सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात कार्यरत असून त्यांनी यावर्षीच्या पावसाळा पूर्व तपासणी मोहिमेदरम्यान मुंबईच्या कानाकोपऱ्यातील विविध भागांचे व इमारतींच्या परिसरांचे सर्वेक्षण केले आहे.

कोरोना कोविड 19' च्या पार्श्वभूमीवर सर्व्हेक्षण या तपासणीदरम्यान इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, झोपडपट्ट्यांमधील पाण्याचे पिंप, प्लास्टिक किंवा ताडपत्रीमध्ये साचलेले पाणी, परिसरात पडून असले टायर व त्या टायरमध्ये साचलेले पाणी, झाडांच्या कुंड्यांखालील ताटल्या, शोभिवंत झाडांच्या कुंड्या, पाणी असणाऱ्या शोभेच्या वस्तू, नारळाच्या करवंट्या व त्यात साचलेले पाणी, फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या मधील किंवा बाटल्यांच्या झाकणांमधील पाणी इत्यादींची तपासणी करण्यात येत आहे. 'कोरोना कोविड 19' च्या पार्श्वभूमीवर हे सर्व्हेक्षण करताना मुखावरण (मास्क) वापरणे, हात मोजे (हॅन्ड ग्लोव्हज) वापरणे, शारीरिक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) काटेकोरपणे पाळणे यासारख्या बाबींची परिपूर्ण दक्षता घेतली जाते.

मुंबईतील नदी-नाल्यांचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करणार; पावसाळ्यापूर्वी काम करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

डासांच्या उत्पत्ती स्थानांबद्दल व त्यांच्या जीवनचक्राबाबत थोडक्यात माहिती

या डासांच्या प्रत्येक उत्पत्तीस्थानाच्या ठिकाणी एकावेळी एक मादी डास 100 ते 150 अंडी घालते. एका मादी डासाचे सरासरी आयुर्मान हे 3 आठवड्यांचे असते. या तीन आठवड्यांच्या कालावधीत मादी डास किमान 4 वेळा साचलेल्या पाण्यात अंडी घालते. म्हणजेच एका मादी डासामुळे साधारणपणे 400 ते 600 डास तयार होत असतात. हे डास डेंग्यू/मलेरिया सारख्या आजारांच्या प्रसारास कारणीभूत ठरतात.

महापालिका क्षेत्रात विविध रोगांवर नियंत्रण असावे व रोगांच्या प्रसाराला प्रतिबंध व्हावा म्हणून सार्वजनिक आरोग्य खाते, कीटकनाशक खाते यासारखे महानगरपालिकेचे विविध विभाग अविरतपणे कार्यरत असतात. तसेच औषध फवारणी, धूम्र फवारणी, डासांची उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट करणे, यासारख्या विविध उपाययोजना देखील महापालिकेद्वारे करण्यात येत असतात.

कुठे होते डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती? गेल्या काही वर्षांतील आकडेवारी बघितली असता एकूण डेंग्यूबाधित रुग्णांपैकी सुमारे 80 टक्के रुग्णांच्या घरामध्ये किंवा घराशेजारील परिसरात डेंग्यू विषाणूंचा प्रसार करणाऱ्या 'एडीस इजिप्टाय' डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली होती. डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणाऱ्या या डासांची उत्पत्ती ही साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. सर्वेक्षणातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार डेंग्यू विषाणू वाहक डासांच्या अळ्या प्राधान्याने पाण्याचा पिंप, फेंगशुई झाड, बांबू प्लॅन्ट्स, मनीप्लँट्स यासारखी शोभिवंत झाडे; घराच्या सज्जामध्ये (गॅलरी) किंवा सभोवताली झाडांच्या कुंड्यांमधील अतिरिक्त पाणी जमा होण्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या ताटल्या (प्लेट्स), वातानुकुलन यंत्रणा, शीतकपाटाचा (रेफ्रिजरेटर) डिफ्रॉस्ट ट्रे यासारख्या विविध स्रोतांमध्ये अल्प प्रमाणात असलेल्या स्वच्छ पाण्यात देखील या डासांची उत्पत्ती आढळून आली आहे.

कुठे होते मलेरियाचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती? मलेरियाच्या बाबतीत सुद्धा मलेरियाचे परजीवी (Plasmodium Species) पसरविणाऱ्या `ऍनॉफिलीस स्टीफेन्सी' डासाची उत्पत्ती देखील स्वच्छ पाण्यातच होते. मात्र, या प्रकारच्या डासांची प्राधान्य उत्पत्तीस्थळे ही काही प्रमाणात वेगळी आहेत. उदाहरणार्थ, विहीरी, पाण्याच्या टाक्या, कारंजे, कूलींग टॉवर, पाण्याचे हौद, इमारत बांधकामाच्या ठिकाणी साचवलेले पाणी इत्यादी.

परिसरातील डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी! घराशेजारील परिसरात असणारे टायर्स, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्यांची झाकणे, पाण्याचे पिंप, मनी प्लांट, बांबू यासारख्या शोभेच्या झाडांसाठी ठेवण्यात येणारे पाणी, काचेची किंवा धातूची कासवाची मूर्ती ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, कुंड्यांखालील ताटल्या, यासारख्या विविध वस्तुंमध्ये पावसाचे पाणी साचते व या पाण्यातही डास अंडी घालतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या निरुपयोगी वस्तू त्वरीत नष्ट कराव्यात, असेही आवाहन महापालिकेच्या कीटक नाशक खात्याने यानिमित्ताने केले आहे.

का व कसा पाळावा कोरडा दिवस? साठलेल्या पाण्यात डासांच्या विविध अवस्था ह्या साधारणपणे आठ दिवसांपर्यंत असतात. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या घरामध्ये व घराशेजारील परिसरात साठविलेले किंवा साचलेले पाणी सात दिवसांपेक्षा अधिक काळ राहणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस घरातील पाणी साठवण्याची भांडी कोरडी ठेवून कोरडा दिवस पाळणेही अतिशय आवश्यक आहे.

अनेक घरांच्या बाहेर पाणी साठवण्यासाठी पिंप वा ड्रम वापरले जातात. यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात डासांच्या अळ्या आढळून येतात. याकरिता पाण्याचे पिंप हे आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडे ठेवावे. यासाठी सदर पिंप पूर्णपणे उलटे करुन ठेवल्यानंतर काही वेळाने हे पिंप कोरड्या व स्वच्छ कापडाने आतून पुसावे. कोरड्या फडक्याने पिंप आतून पुसत असताना ते दाब देऊन पुसावे जेणेकरुन पिंपाच्या आतील बाजूला चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील. नंतर या पिंपात पाणी भरल्यावर न विसरता स्वच्छ दुपदरी कपड्याद्वारे पिंपाचे तोंड बांधून ठेवावे, जेणेकरुन सदर पिंपात डासांची मादी अंडी घालू शकणार नाहीत, अशी माहिती महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे देण्यात आली आहे.

Coronavirus | मुंबईतील ग्रोथ रेट हळूहळू कमी होतोय, परिस्थिती हाताबाहेर नाही : प्रा. नीरज हातेकर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget