एक्स्प्लोर
मुंबईकरांची कामात आघाडी, पगारात पिछाडी
मुंबईकर वर्षाला सुमारे 3,315.17 तास काम करतात. वर्षाकाठी काम करण्याचा सरासरी कालावधी 1,987 तास आहे. म्हणजे युरोपातील रोम (1,581 तास) आणि पॅरिस (1,662 तास) या शहरांच्या दुप्पट काम मुंबईकर करतात.
मुंबई : रोजीरोटी मिळवण्यासाठी न जाणो देशातील कोणकोणत्या भागातून लोक मुंबई गाठतात. मात्र याच मुंबईत कंबर कसूनही मुंबईकरांना म्हणावं तितका रोजगार मिळत नाही. स्वीस बँक यूबीएसनं केलेल्या सर्व्हेत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अलिकडेच जगभरातील 77 महानगरांमध्ये एक सर्व्हे करण्यात आला. त्यात मुंबईकर खूप कष्टाळू आणि सर्वात जास्त तास काम करतात, असं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. मात्र कमाईच्या बाबतीत मुंबईकरच पिछाडीवर असल्याचंही या सर्व्हेत नमूद करण्यात आलं आहे.
मुंबईकर वर्षाला सुमारे 3,315.17 तास काम करतात. वर्षाकाठी काम करण्याचा सरासरी कालावधी 1,987 तास आहे. म्हणजे युरोपातील रोम (1,581 तास) आणि पॅरिस (1,662 तास) या शहरांच्या दुप्पट काम मुंबईकर करतात.
या सर्वेक्षणात न्यूयॉर्क आणि मुंबईची तुलनात्मक उदाहरणे देण्यात आली आहेत. एक आयफोन एक्स खरेदी करायचा झाल्यास न्यूयॉर्ककरला 54 तास काम करावं लागतं, तर मुंबईकरांना तब्बल 917 तास काम करावं लागतं. मुंबईतील राहणीमानसुद्धा खर्चिक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement