एक्स्प्लोर
ट्रेनच्या टपावर चढून सेल्फी घेताना मुंबईत तरुणाला शॉक
मुंबई : ट्रेनच्या टपावर चढून सेल्फी काढण्याची हौस मुंबईतील तरुणाच्या चांगलीच अंगलट आली आहे. ट्रेनवर चढून सेल्फी काढताना शॉक लागल्याने अरबाज खान नावाच्या 20 वर्षीय तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई मिरर वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
मुंबईतील जोगेश्वरी भागात राहणारा 20 वर्षीय अरबाज कुर्ला रेल्वे यार्डात ट्रेनवर चढून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्यामुळे त्याला विजेचा धक्का बसला. अरबाजच्या मित्राने पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शुक्रवारी दुपारी 12.40 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अरबाज आणि त्याचा मित्र मोहम्मद अजमल आणि एका मित्राला भेटण्यासाठी कुर्ल्याला आले होते. मात्र रेल्वे यार्डासाठी वेगळी जागा सापडल्याने दोघांनी फोटो काढायचं ठरवलं. एका रिकाम्या लोकलवर ते दोघं चढले. मात्र वायरमध्ये विद्युतप्रवाह असल्याची कल्पना त्यांना नव्हती.
अरबाज पुढे चढला आणि अनवधानाने त्याने वायरला धरलं, त्याचक्षणी त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि तो ट्रेनच्या टपावरुन खाली कोसळला, अशी माहिती त्याच्या मित्राने दिली. अजमलने मदतीसाठी धावाधाव केली आणि पोलिसांना बोलावलं. अरबाजवर सायन रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी भायखळ्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दोन महिन्यांपूर्वी डोंबिवलीतही फोटोग्राफीचे आठ विद्यार्थी रेल्वे यार्डात फोटो काढण्यासाठी शिरले होते. मात्र रेल्वे पोलिसांना वेळीच याची कल्पना आल्याने त्यांना आवरलं आणि समज देऊन सोडून देण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement