एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांची सांगता 20 मे रोजी होत असून मुंबईतसह 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. राज्यातील पहिल्या 4 टप्प्यात किरकोळ घटना वगळता मतदान सुरळीत आणि शांततेच पार पडले

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा शेवटचा टप्पा मुंबईसह उपनगरातील लोकसभा मतदारसंघातील मतदानानंतर (Voting) पार पडत आहे. त्यासाठीच्या प्रचाराची सांगत आज सायंकाळी 6 वाजता झाली असून प्रशासन मतदानाच्या तयारीला लागले आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या 5 व्या टप्प्यांतील मतदान 20 मे  रोजी होणार असून बृहन्मुंबई शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाणे मुंबई पोलीस (Police) दलाकडून 5 अपर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपआयुक्त, 77 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2475 पोलीस अधिकारी व 22,100 पोलीस अंमलदार व 03 दंगल काबु पथक (RCP) बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत. राजधानी मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी राज्याच्या विविध भागातून पोलिसांची आगाऊ कुमूक मागविण्यात आली आहे.  

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांची सांगता 20 मे रोजी होत असून मुंबईतसह 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. राज्यातील पहिल्या 4 टप्प्यात किरकोळ घटना वगळता मतदान सुरळीत आणि शांततेच पार पडले. त्यामध्ये, पोलिसांचा महत्त्वाचा वाटा आहे. तर, राज्यातील प्रचारसभांचाही शेवट आज झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांच्या सभा मुंबईसह महाराष्ट्रात पार पडल्या. या सभांसाठीही पोलिसांनी दिवस-रात्र मेहनत घेत चोख बंदोबस्त निभावून दाखवला. आता, शेवटच्या 20 मे रोजीच्या मतदानसाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे.

मुंबईसह उपनगरातील अतिरिक्त मदतीकरीता 170 पोलीस अधिकारी व 5360 पोलीस अंमलदार व 6200 होमगार्ड असे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. तसेच महत्वाच्या ठिकाणी 36 केंद्रिय सुरक्षा दले (CAPF / SAP) यांची बंदोबस्तकामी नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे, मुंबईत एकुण 2752 पोलीस अधिकारी, 27460 पोलीस अंमलदार, 6200 होमगार्ड, 03 दंगल काबु पथक (RCP), 36 केंद्रिय सुरक्षा दले (CAPF / SAP) निवडणुक बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत.

आत्तापर्यंत 8088 प्रतिबंधक कारवाई

लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झालेच्या म्हणजेच 16 मे पासून आजपर्यंत विविध कायद्याअंतर्गत मुक्त आणि निष्पक्ष निवडणुक पार पाडण्याकरीता एकुण 8088 प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने फौ.दं.प्र.सं. कलम 144 अन्वये15 मे पासून मुंबई पोलीसांकडून आदेश प्रसारीत करण्यात आले असून मतदान केंद्रांच्या 100 मीटर परीघात (मतदान केंद्र परिसर)आणि मतदान केंद्राच्या आत मोबाईल फोन बाळगता येणार नाही. 

हेही वाचा

प्रज्ज्वल रेवण्णा कोण कर्नाटकातला? तसा इथला उमेदवार आहे समोरचा? उद्धव ठाकरेंचा राहुल शेवाळेंवर हल्लाबोल

पाचव्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 20 मे ला मुंबईतील 6 जागांसह राज्यातील 13 जागांसाठी मतदान

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :28 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Embed widget