प्रज्ज्वल रेवण्णा कोण कर्नाटकातला? तसा इथला उमेदवार आहे समोरचा? उद्धव ठाकरेंचा राहुल शेवाळेंवर हल्लाबोल
Uddhav Thackeray on Rahul Shewale : भाजपकडे उमेदवार नाही, आपलेच गद्दार पोरं घेऊन फिरत आहेत. भारतीय जनता पक्षाला राजकारणात पोरंच होत नाहीत.
Uddhav Thackeray on Rahul Shewale : "भाजपकडे उमेदवार नाही, आपलेच गद्दार पोरं घेऊन फिरत आहेत. भारतीय जनता पक्षाला राजकारणात पोरंच होत नाहीत. त्यांना दुसऱ्यांची मुलं पळवावी लागतात. इकडे अनिल देसाईंसारखा चारित्र्यवान माणूस मी तुम्हाला उमेदवार म्हणून दिलेला आहे. अनिल देसाईंचे राज्यसभेतील व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण समोर जो उमेदवार आहे, त्याचे दुसरे व्हिडीओ तुमच्याकडे आले असतील. रेवण्णा कोण कर्नाटकातला? ज्याच्याकडे फिल्म वगैरे होत्या. तसा इथला उमेदवार आहे समोरचा?", असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. दक्षिण मध्य मुंबईचे मविआचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.
माझ्या देशभक्त या शब्दाला आक्षेप घेणारे देवेंद्र फडणवीस देशद्रोही आहेत का?
उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या मी माझ्या भाषणाची सुरुवात माझ्या देशभक्त बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो अशी करतो. आता त्याच्याबद्दल सुद्धा काही जणांच्या पोटात दुखल. काल फडणवीस म्हणाले, तिकडं गेलो तर हिंदू शब्द सोडला. मी हिंदू शब्द सोडलेला नाही. हिंदूत्व कधी सोडणार नाही. मी भाजपला लाथ घातली आहे. हिंदूत्व कसं सोडेन? पण माझ्या देशभक्त या शब्दाला आक्षेप घेणारे देवेंद्र फडणवीस देशद्रोही आहेत का? देशभक्त असणे हा देशात गुन्हा आहे का? आम्ही मोदभक्त नाही देशभक्त आहोत, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
सरदार पटेलांनी संघाला बंदी घातली होती, मोदींनी त्यांचा पुतळा उभारलाय
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी काल मुलाखत देताना एक मुद्दा मांडला होता. ज्या पद्धतीने हल्लीचा भारतीय जनता पक्ष आणि विशेषत: नरेंद्र मोदी आणि त्यांचा कंपू वागतोय. वापरा आणि फेकून द्या. दोन वेळेला शिवसेनेचा पाठिंबा घेतला आणि पंतप्रधान झाले. आता मला नकली संतान आणि नकली सेना म्हणायला लागले. मी असंच म्हटलं की, एकदिवस लांब नाही की, मोदी संघाला देखील नकली म्हणतील. आज जेपी नड्डांनी एका मुलाखतीत म्हटलंय की आम्हाला संघाची गरज नाही. आता पुढचा धोका संघाला आहे. सरदार पटेलांनी संघाला बंदी घातली होती. मोदींनी त्यांचा पुतळा उभारलाय. तुम्ही संघावर बंदी आणणार? पण 4 जूननंतर भाजपचं काय होणार आहे. सगळे भाडोत्री जमा करत आहेत, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या