एक्स्प्लोर

Mumbai University Senate Election: मुंबई विद्यापीठाच्या सीनेट निवडणुकीचं वातावरण तापलं, यश सरदेसाईंनी घेतली शिंदे गटाच्या पूर्वेश सरनाईकांची भेट

Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाची (Mumbai University)  आगामी सीनेट निवडणूक चुरशीची होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनांमध्ये चुरस वाढली आहे.

मुंबई :  मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University)  आगामी सीनेट निवडणुकीसाठी (Sinate Election)  मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंनी जुळवाजुळव करण्यास सुरूवात केली आहे. मनसेच्या नितीन सरदेसाई यांचा मुलगा यश सरदेसाई यांनी नुकतीच शिंदे गटाच्या पूर्वेश सरनाईक यांची भेट घेतलीय. गेल्या दहा वर्षांपासून मुंबई विद्यापीठाच्या सीनेटवर आदित्य ठाकरे यांचं वर्चस्व आहे. त्यालाच धक्का लावण्याचा चंग अमित ठाकरेंनी बांधल्याचं बोललं जातंय.

दरम्यान आदित्य ठाकरेंनी सिनेट निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलवली आहे. या निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि मनसे या तिन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाची सीनेट निवडणूक चुरशीची होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनांमध्ये चुरस वाढली आहे. सिनेट निवडणुकीत सुद्धा शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

मागील पदवीधर सिनेट निवडणुकीमध्ये युवासेनेने 10 पैकी 10 जागांवर विजय मिळवला होता. मात्र आता युवासेना सुद्धा दोन गटात विभागली गेली आहे.  त्यामुळे पदवीधर सिनेट निवडणुकीत 10 पैकी 2 माजी सिनेट सदस्य हे शिंदे गटात आहेत. येणाऱ्या सिनेट निवडणुका पाहता सर्व पक्षांनी संघटनांनी आपली तयारी सुरू केली आहे. मतदार नोंदणीवर अधिकाधिक व्हावी यासाठी भर दिला जात आहे. 

ठाकरेंची युवा सेना सिनेट निवडणुकीमध्ये दहा पैकी दहा जागांवर उमेदवार लढवण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे शिंदे गटाच्या युवा सेनेने आपली रणनीती अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. शिवाय या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस, छात्र भारती हे समविचारी पक्षाची साथ देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या सिनेट निवडणुकीची चुरस आणखी वाढलेली पाहायला मिळत आहे.  भाजप आणि मनसेच्या विद्यार्थी संघटनेची ताकद मोठी आहे.  

सीनेटच्या निवडणुकीतुन तरूणाईचा कौल कुणाच्या बाजूनं आहे हे स्पष्ट होईल सिनेट निवडणुकीत जो बाजी मारेल त्या मुंबई महानगरपालिकेत तरूणांचा पाठिंबा मिळेल असं हे समीकरण आहे. आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता पाहायला मिळाली आहे. पण आता शिंदे, मनसे आणि भाजप हे तिघे एकत्र येत असल्यानं मुंबई महानगरपालिकाही ठाकरेंसाठी सोपी नसणार आहे त्यामुळे सिनेट निवडणुकीत हे तिघंही मोठं ताकदीनं उतरताना दिसतील. 

संबंधित बातम्या :

Jitendra Awhad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्हाईसरॉय ॲाफ महाराष्ट्र, जितेंद्र आव्हाडांचा निशाणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie ReportBharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ कोल्हापूर महापालिकेची जबाबदारी आपण घ्या, इथून जबाबदारी घेऊनच जायचं आहे' वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना कोणी दिला सल्ला?
'हसन मुश्रीफ कोल्हापूर महापालिकेची जबाबदारी आपण घ्या, इथून जबाबदारी घेऊनच जायचं आहे' वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना कोणी दिला सल्ला?
Dhananjay Munde: 'मैं आईना हूं, आईना दिखाऊंगा', धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून सुरेश धसांना इशारा
'मैं आईना हूं, आईना दिखाऊंगा', धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून सुरेश धसांना इशारा
Video : हायस्कूलच्या ऑफिसमध्येच चारी कोपऱ्यात शिक्षक शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Video : मिठ्या, किसिंग अन् बरंच काही! हायस्कूलच्या ऑफिसमध्येच शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Embed widget